esakal | बेलदार भटका समाज संघाचे `या`  मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन 
sakal

बोलून बातमी शोधा

Beldar Bhatka Samaj Sangh Agitation In Sindhudurg

शिवसेना आमदार वैभव नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद सदस्य रणजित देसाई, राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक यांनी आंदोलनकर्त्यांची भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

बेलदार भटका समाज संघाचे `या`  मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी - राज्य सरकारने मार्च ते जुलै या पाच महिन्याचे 300 युनिट पर्यंतचे घरगुती वापराचे विजबिल माफ करावे, आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत रस्त्यावर काम करणाऱ्या प्रत्येक कामगारांना दहा हजार रुपये देण्याची योजना राबवून त्याचा लाभ भटक्‍या जाती जमातीच्या लोकांना देण्यात यावा, यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बेलदार भटका समाज संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. 

याबाबतचे निवेदन जिल्हा बेलदार भटका समाज संघाच्यावतीने जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांना देण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष मधुकर जाधव, रावसाहेब पवार, गणेश जाधव, किरण चव्हाण, नितेश पवार, शिवाजी पवार, अजय जाधव, सागर पवार, बाळकृष्ण जाधव, मनोज जाधव, संतोष पवार आदी उपस्थित होते. 

राजकीय नेत्यांची आंदोलनाला भेट 
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेलदार भटक्‍या समाजाने विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला विविध राजकीय नेत्यांनी भेट देत पाठिंबा दर्शविला. शिवसेना आमदार वैभव नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद सदस्य रणजित देसाई, राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक यांनी आंदोलनकर्त्यांची भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्‍वासन दिले. 


बेलदार समाजाच्या प्रमुख मागण्या अशा - 

  • राज्य सरकारने मार्च ते जुलै या पाच महिन्याचे घरगुती वीज बिल माफ करावे. 
  • आत्मनिर्भर भारत अंतर्गत रस्त्यावर काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराला दहा हजार रुपये द्यावेत. 
  • या योजनेचा लाभ भटक्‍या जाती जमातीच्या लोकांना द्यावा. 
  • ज्यादा दराने वस्तू विकणाऱ्यावर कारवाई करावी. 
  • बेरोजगारांना जोड धंद्याच्या निर्मितीकरिता अर्थसहाय्य द्यावे. 
     
loading image