कोकणात येण्यासाठी एसटीच्या विशेष गाड्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता एसटी महामंडळाने मुंबई व ठाणे विभागातून कोकणात जाण्यासाठी जादा गाड्यांची सोय केली आहे. या जादा गाड्या मुंबई सेंट्रल, परळ, बोरिवली, ठाणे, नालासोपारा, विरार, भांडुप व विठ्ठलवाडी बस स्थानकातून सुटणार आहेत.

खेड - या वर्षी सुटीच्या कालावधीमध्ये कोकण मार्गावर विविध स्थानकातून जादा बसेस व विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे सुटीसाठी गावी येणाऱ्यांचा प्रवास सुखकर होणार आहे. 

उन्हाळी सुटी पडताच मुंबईकरांची कोकणात गावाकडे जाण्याची लगबग सुरू होते. गावाकडे येणारे मुंबईवासीय रेल्वे तसेच एसटीलाही प्राधान्य देतात. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता एसटी महामंडळाने मुंबई व ठाणे विभागातून कोकणात जाण्यासाठी जादा गाड्यांची सोय केली आहे. या जादा गाड्या मुंबई सेंट्रल, परळ, बोरिवली, ठाणे, नालासोपारा, विरार, भांडुप व विठ्ठलवाडी बस स्थानकातून सुटणार आहेत. नियमित सुटणाऱ्या गाड्यांव्यतिरिक्त या गाड्या सुटणार आहेत. 

मुंबईतून सुटणाऱ्या गाड्या अशा ः मुंबई सेंट्रलवरून ५.००वा. मुंबई-दापोली, ५.३० वा. मुंबई- देवरूख, ६.०० वा. मुंबई- शिवथर, ६.००वा. मुंबई-गुहागर, ६.३० मुंबई- दापोली (निमआराम), ७.०० मुंबई-रत्नागिरी, ११.३० मुंबई-श्रीवर्धन (निमआराम), १६.०० मुंबई-कणकवली, १६.३० मुंबई-मालवण (निमआराम), २०.१५ मुंबई-रत्नागिरी, २०.३० मुंबई-रत्नागिरी, २०.४५ मुंबई-रत्नागिरी, २०.५० मुंबई-रत्नागिरी, २१.०० मुंबई-पांगारी, २२.०० मुंबई- गुहागर (निमआराम), २२.१५ मुंबई-दापोली (निमआराम), २२.४५ मुंबई-दापोली, ००.३० मुंबई-महाड, परळ बस आगारातून- ८.०० वा. परळ- कांडवण, १७.३० परळ-गगनबावडा, २०.०० परळ-नेसरी, २२.३० परळ-दापोली, बोरिवली आगार येथून ४.३० बोरिवली-मुरूड, ६.०० बोरिवली-गोवले, ६.१५ बोरिवली-गुहागर, ६.३० बोरिवली-देवरूख, ७.३० बोरिवली-रत्नागिरी, ८.३० बोरिवली-खेड, १५.०० बोरिवली-तुळशी-खेड, १६.०० १७.०० बोरिवली-कणकवलीमार्गे पांचल, १७.०० बोरिवली-कुडाळ, १९.०० बोरिवली -येळवण, १९.३० बोरिवली-गुहागर, १९.४५ बोरिवली-लांजा, २०.०० बोरिवली-मंडणगड मार्गे भोळवली, २०.०० बोरिवली-रत्नागिरी, २०.१५ बोरिवली-रत्नागिरी, २०.३० बोरिवली-मंजुत्री, २०.३० बोरिवली-रत्नागिरी-जयगड बंदर, २१.१५ बोरिवली-करजुवे तिसंगी, २१.३० बोरिवली-रहाटाघर, २२.०० बोरिवली-खेड, २३.०० बोरिवली-शिवतर, २३.०० बोरिवली-चिपळूण, ००.३० बोरिवली-महाड.
नालासोपारावरून- ४.४५ नालासोपारा-श्रीवर्धन, ५.०० नालासोपारा-मुरूड, ५.३० नालासोपारा-खुटील, ६.३० नालासोपारा-रत्नागिरी, ८.०० नालासोपारा-केळशी  पिंपरपार, १७.०० नालासोपारा-राजापूर, १८.०० नालासोपारा-बुरुंबेवाडी, १९.४५ नालासोपारा-खरवते, २०.०० नालासोपारा-माखजन तसेच विरारहून- ७.०० विरार-गुहागर, १९.४५ विरार- गुहागर, ठाणेहून- ६.३० ठाणे-फौजी आंबवडे, ७.०० ठाणे-पन्हाळजे, १०.०० भाईंदर-गुजरकोंड-मंडणगड, ८.०० ठाणे-कावळे गांव, २१.३० ठाणे-शिंदी, २१.३० ठाणे-उंबरघर, २३.०० ठाणे-चिपळूण, भांडूपहून- ०७.०० भांडूप-महाड, ०८.०० भांडूप-माखजन, २०.४५ भांडूप-खेड, २१.०० भांडूप-चिपळूण, २१.१५ भांडूप-गुहागर, कल्याणहून- २०.०० कल्याण-देवरूख, २१.०० कल्याण-दापोली, विठ्ठलवाडीहून- ०५.४५ विठ्ठलवाडी-चिपळूण, २१.३० विठ्ठलवाडी-चिंद्रावले गराटेवाडी, २२.०० विठ्ठलवाडी-दापोली आदी गाड्यांचा समावेश आहे.

Web Title: Belgaum News special ST for summer for Konkan