Belgaum Vegetable Trucks Stopped In Amboli
Belgaum Vegetable Trucks Stopped In Amboli

बेळगावच्या भाजी गाड्या आंबोलीत रोखल्या अन्...

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग) - बेळगावमध्ये कोरोनाचे रूग्ण सापडले असतानाही तेथील भाजी आपल्या जिल्ह्यात दाखल होत आहे. 
आंबोलीमार्गे जिल्ह्यात भाजी वाहतुकीच्या गाड्या आज सकाळी आंबोली ग्रामस्थांनी अडवल्या; मात्र संबंधित गाड्या अडवण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून नसल्याचे कारण सांगत पोलिसांनी या गाड्यांना सिंधुदुर्ग प्रवेश दिला. एकुणच या प्रकाराने आंबोली ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या बेळगावमध्ये कोरोनाचे बरेच रूग्ण भेटले आहेत. तेथील भाजी विक्रेतेही कोरोनाबाधित आहेत. असे असताना बेळगावमधुन भाजी व इतर वाहतूक आपल्या जिल्ह्यात सुरू आहे. अशाच प्रकारचे भाजी वाहतूक करणारे ट्रक आज सकाळी आंबोलीत ग्रामस्थांनी अडवले. पोलीसांकडे आपल्या जिल्ह्यात या ट्रकला परवानगी दिली का, त्यांच्याकडे पास आहेत का, अशी विचारणा केली.

त्यावेळी आंबोली चेकपोस्टवर असलेल्या पोलिसांनी ही प्रकारची वाहतूक थांबवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले नाहीत, असे उत्तर दिले. यानंतर हे ट्रक सोडण्यात आले. एकीकडे जिल्हा कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असताना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आंबोली गावचे व जिल्ह्याचे आरोग्य धोक्‍यात येण्याचा संभव असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. वेळीच आपल्या गावच्या व जिल्ह्याच्या भल्यासाठी ग्राम कृती समितीच्या अध्यक्षांच्या (सरपंच) मदतीने व माध्यमातुन या प्रशासकीय हलगर्जीपणाविरोधात आवाज उठवला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी बोलून दाखवली. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com