आमदार नीतेश राणेंनी भुमीपूजन केले की ते काम होतेच

आमदार नीतेश राणेंनी भुमीपूजन केले की ते काम होतेच

वैभववाडी - काम मंजुर असो किंवा नसो आमदार नीतेश राणेंनी भुमीपूजन केले की ते काम होतेच हे तालुक्‍यातील जनतेला माहीत आहे; मात्र वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके हे आमदारांवर टिका करीत आहे. त्यांनी आमदारांवर टिका करण्याचे धाडस करू नये, असा इशारा स्वाभिमानचे जिल्हा प्रवक्ते भालचंद्र साठे यांनी येथे दिला.

आमदार राणेंकडुन मंजुर नसलेल्या कामांची भुमिपुजने झाल्याची टिका श्री. लोके यांनी केली होती. याला श्री. साठे यांनी प्रतित्युत्तर दिले. यावेळी तालुकाध्यक्ष अरविंद रावराणे, जयेंद्र रावराणे, नासीर काझी, दिलीप रावराणे आदी उपस्थित होते.

श्री. साठे म्हणाले, ""राज्यात आणि केंद्रात सत्ता शिवसेना भाजपची आहे; परंतु त्या सत्तेच्या माध्यमातुन तालुक्‍याला काय न्याय दिलात याचे उत्तर जनतेला दिले पाहीजे. आमदार राणे विरोधी पक्षात असताना देखील त्यांनी विकासासाठी भरीव निधी आणण्याचे काम केले आहे. मंजुर नसलेली कामे सुध्दा करण्याची धमक त्यांच्यात आहेत. हे तालुक्‍यातील जनतेला माहीत आहे. वैभववाडीतील सुलभ शौचालय त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री सडकची कामे आमदार राणेंमुळेच झाली आहेत. त्यामुळे यावुढे सुध्दा या कामांची भुमिपूजन आणि उद्‌घाटन तेच करणार आहेत.''

ते म्हणाले, ""टिका करण्यासाठी काहीच नसल्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी सेल्फी पॉईंटचा मुद्दा उपस्थित करीत आहेत. बाजारपेठेतील जीर्ण वृक्ष पडुन कुणालाही दुखापत होवु नये म्हणुन त्या वृक्षाच्या फांद्या तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी त्या तोडलेल्या वृक्षांवर काही पॉईंट तयार करण्यात आले; परंतु हेतु जीर्ण वृक्ष तोडणे हा होता. मोफत औषध हा उपक्रमाचा लाभ धनधाडग्यांकडुन घेतला जावु लागल्यामुळे तो बंद करावा लागला. वायफाय सेवेबद्दल विचारण्याअगोदर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बीएसएनएलची सेवा सुरू आहे का याची पडताळणी करावी. भुईबावडा येथील विज फिडरचा लोकार्पण सोहळा खासदारांनी केला; परंतु या फिडर उभारणीत त्यांचे योगदान काय ? लोकार्पण सोहळ्याला त्या परिसरातील एकही सरपंच उपस्थित नव्हता.''

वारकरी साप्रदांयावर टिका नाहीच
आमदार राणेंच्या माध्यमातनु दरवर्षी शेकडो वारकऱ्यांना पंढरपुरवारीसाठी सहकार्य केले जाते. ते किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडुन वारकरी सांप्रदायावर कधीही टिका करण्यात आलेली नाही; परंतु निवडणुकीच्या तोंडावर दिशाभुल करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आहे, असे मत श्री. साठे यांनी व्यक्त केले.

शिवसेना-भाजपकडूनही मंजुरी नसलेल्या कामांचे भुमिपुजन
शिवसेना-भाजपकडुन आचिर्णे धनगरवाडी, गडमठ तेलीवाडी, लोरे डोंगरेवाडी या मंजुर नसलेल्या रस्ता कामांची भुमिपुजने करण्यात आल्याचा आरोप माजी बांधकाम सभापती दिलीप रावराणे यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com