Bharat Bandh : protest against government in pahli
Bharat Bandh : protest against government in pahli

Bharat Bandh : सरकारच्या निष्क्रीयतेचा निषेध, पाली तहसिलदारांना निवेदन

पाली : इंधनदरवाढ व महागाईच्या विरोधात काँग्रेससह विरोधी पक्षाने सोमवारी पुकारलेल्या भारत बंदला सुधागड मध्ये समिश्र प्रतिसाद मिळाला. तालुक्यात काँग्रेससह शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेबरोबरच पुरोगामी व समविचारी संघटनांनी पाठिंबा दर्शविला. 

वाढत्या महागाईसह सर्वसामान्यांची गळचेपी करणार्‍या सरकारी धोरणांच्या निषेधार्थ हल्लाबोल करण्यात आला. दरम्यान पाली सुधागड तहसिलदार बि.एन. निंबाळकर यांना निवेदन सादर करण्यात आले. इंधन वाढीबरोबर सरकारने केलेल्या नोटबंदी, जि.एस.टी, राफेल करार, वाढती महागाई, वाढता हिंसाचार व सरकारची वाढती हुकुमशाही याचा निषेध यावेळी करण्यात आला. यावेळी वाढत्या महागाईचा निषेध दर्शविताना 'सरकारचे हेच का अच्छे दिन' अशा शब्दात काँग्रेस नेते अनिरुद्ध कुलकर्णी यांनी निषेध केला.  शे.का.प नेते सुरेश खैरे यांनी इंधनदरवाढीच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा जाहीरपणे पाठिंबा असल्याचे सांगितले. केंद्र व राज्य सरकारकडून राबविण्यात येणारी आर्थीक धोरणे सर्वसामान्यांना देशोधडीला लावणारी आहेत. निवडणुकांपुर्वी केलेल्या घोषणा व वल्गना फोल ठरल्या आहेत. या बंदला सुधागडात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे खैरे म्हणाले. 

यावेळी शे.का.प नेते तथा जि.प सदस्य सुरेश खैरे, कॉग्रेस सुधागड तालुकाध्यक्ष अनिरुध्द (बाबा) कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेस पेण सुधागड रोहा मतदारसंघाच्या अध्यक्षा गिता पालरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ग.रा.म्हात्रे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुधागड तालुकाध्यक्ष सुनिल साठे, म.न.वि.से विद्यार्थी सेनेचे सुधागड तालुकाध्यक्ष सचिन झुंजारराव, जनार्दन जोशी, पुरोगामी युवक संघटनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष अरिफ मनियार, शे.का.प चिटणिस उत्तमराव देशमुख, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे पाली शहराध्यक्ष अभिजीत चांदोरकर, गजानन शिंदे, पराग मेहता, सुधीर साखरले, नितीन परब, संजोग शेठ, उदय सावंत आदिंसह कॉग्रेस, शे.का.प, राष्ट्रवादी कॉग्रेस व म.न.सेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्तीत होते.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com