भरतगड, रसाळगडाची दुरुस्ती अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

दाभोळ - रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड या तीन जिल्ह्यांतील किल्ल्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्गातील भरतगड व रसाळगड या किल्ल्यांच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दापोली तालुक्‍यातील हर्णै येथील सुप्रसिद्ध सुवर्णदुर्गाची देखील नुकतीच साफसफाई करण्यात आली. सुवर्णदुर्ग व पूर्णगड किल्ल्यांसाठी ४ कोटी २० लाखांचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

यामुळे दोन किल्ल्यांचे काम अंतिम टप्प्यात आले, तर काही किल्ले अद्याप निविदा न काढल्याने दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. काही किल्ल्यांचे प्रस्ताव तयार करण्याचे कामदेखील प्रगतिपथावर असल्याचे पुरातत्त्व विभागाकडून सांगण्यात आले. यामुळे किल्ल्यांची सध्या किमान डागडुजी तरी होते आहे; मात्र ऐतिहासिक महत्त्व असलेले इतर किल्ले दुर्लक्षितच आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची व इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यांसह अनेक समाधिस्थळे, महाल, घरे पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहेत. काही किल्ले वा वास्तू अद्याप पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आलेले नाहीत. ते ताब्यात घेण्यासाठी पुरातत्त्व विभाग प्रयत्न करीत आहे. दापोली तालुक्‍यातील हर्णै येथील गोवा किल्ला पुरातत्त्व विभागाकडे नाही. त्यामुळे त्याची दुरुस्तीही सुरू झालेली नाही. या किल्ल्याला पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात जाण्याची व पर्यायाने झळाळी येण्याची प्रतीक्षा आहे.

Web Title: bharatgad, rasalgad repairing final stage