सेनेचा कोकरेतील बाल्लेकिल्ला उलथवणारच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

सावर्डे : माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरवात कोकरे गटातून सुरू झाली. त्यामुळे कोकरे गटातील सहभागी असणारी जनता माझे मायबाप असल्याने गेल्या दीड दशकात सेनेचे प्राबल्य असलेल्या सेनेच्या बाल्लेकिल्ला उलथवल्याशिवाय थांबणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा प्रभारी व गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केले.

सावर्डे : माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरवात कोकरे गटातून सुरू झाली. त्यामुळे कोकरे गटातील सहभागी असणारी जनता माझे मायबाप असल्याने गेल्या दीड दशकात सेनेचे प्राबल्य असलेल्या सेनेच्या बाल्लेकिल्ला उलथवल्याशिवाय थांबणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा प्रभारी व गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केले.

असुर्डे येथे शंकर खापरे यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. या वेळी कोकरे गटासाठी पूनम चव्हाण, तर कुटरे गणातून सीताराम धुमक, कोकरे गणातून समीक्षा घडशी यांना उमेदवारी त्यांनी जाहीर केली. पक्षापेक्षा व्यक्तिमहात्म्य फार काळ टिकत नसून पक्षामध्ये राहून पक्षाच्या हिताचे आणि नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्‍न हाताळताच लोक आपल्याला खांदावर घेतात. जर जनतेची गद्दारी केली, तर पायदळी तुडवायला कमी करत नाहीत. त्यामुळे कोकरे गटाशी असलेले ऋणानुबंध आजघडीला चांगले आहेत. राष्ट्रवादीचा उमेदवार हा माजी पं. स. उपसभापती संतोष चव्हाण यांच्या पत्नी आहेत. संतोष चव्हाण यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये आपल्या भागाचा चांगला विकास केला असून, त्यांना आता जिल्हापातळीवर काम करण्याची संधी द्या. चव्हाण यांच्या पंचायत समिती कारकिर्दीमध्ये उल्लेखनीय काम केले आहे. यापूर्वीही त्यांनी जि. प. निवडणूक एकदा जिंकली होती. त्यांच्या पत्नी निवडणूक लढवत आहेत. कोकरे गटाचा कायापालट करण्यासाठी पूनम चव्हाण या अतिशय तत्परतेने काम करतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी सांगितले की, पालिका निवडणुकीमुळे आलेली मरगळ झटकून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला हमखास यश आहे. प्रामाणिकपणे सर्वांनी जिद्दीने आणि चिकाटीने कामाला लागू या. गेली पंधरा वर्षे थोडक्‍यात राष्ट्रवादीला हुलकावणी देणाऱ्या या कोकरे गटामध्ये कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचाच असा चंग बांधूया. या वेळी विजय गुजर, संतोष चव्हाण, शशिकांत दळवी, राजेंद्र मोलक, नागेश दळवी, बाबू कदम, अमजत काझी, सुधीर राजेशिर्के, प्रकाश कदम, संजय कदम, रणवीर मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: bhaskar jadhav to fight sena