'जन्मभूमीकडे वळविला मोर्चा ; मात्र चौकटीबाहेर जाणार नाही'

शनिवार, 27 जून 2020

सीनिअर सीटीजन असलो तरी पक्षवाढीसाठी तरूणाप्रमाणे काम करेन भास्कर जाधव ; चिपळूणात लक्ष देण्याची दिली ग्वाही

चिपळूण (रत्नागिरी) : मी सीनिअर सीटीजन असलो तरी तरूणाप्रमाणे काम करून चिपळूणात पक्ष वाढीसाठी काम करेन. मात्र चौकटीबाहेर जाणार नाही. असे माजीमंत्री आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूण येथे सांगितले. 

आमदार जाधव यांनी चिपळूण तालुक्यातील जनतेसाठी आर्सेनिक आल्बम गोळ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. याचे वितरण आज बांदल हायस्कूलच्या सभागृहात झाले. यावेळी आमदार जाधव यांनी चिपळूण विधानसभा मतदार संघात लक्ष देणार असल्याचे स्पष्ट संकेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दिले. विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचा पराभव झाल्यानंतर चिपळूणची शिवसेना बॅकफुटवर गेली आहे. त्यामुळे कार्यकर्त्याकडून चिपळूणात लक्ष देण्याची विनंती आमदार जाधव यांना केली जात आहे. परंतू ते दहा वर्ष गुहागर मतदार संघात सक्रीय आहेत. आता जन्मभूमीकडे त्यांनी आपला मोर्चा वळविला आहे.

हेही वाचा- अवघ्या तीन तासांत शाळा रेडी टू टीच ; गावाने श्रमदानातून केली उभी शाऴा...

येथील बांदल स्कलूच्या सभागृहात कार्यकर्त्यांना ते म्हणाले, जिल्ह्यात चिपळूण वगळता सर्व आमदार शिवसेनेचे निवडून आले. दुर्दैवाने चिपळूणमध्ये शिवसेनेला पराभव पत्करावा लागला. परंतु घाबरून जाऊ नका, चिपळूणला हक्काचा आमदार नसला तरी मी तुमच्यासोबत आहे. मी गेली 36 वर्षे चौकटीत राहून काम करत आहे. अनेकांनी मला चिपळूण तालुक्याचे नेतृत्व करावे, असा आग्रह धरला आहे. मी नेतृत्व करायला तयार आहे, मात्र चौकटीबाहेर जाणार नाही. तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख यांनी सांगितले तर आपण चिपळूण शिवसेनेला ताकrद देऊ, उभारी देऊ. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे, संपर्कप्रमुख नलावडे, विधानसभा प्रमुख बाळा कदम, शहरप्रमुख उमेश सपकाळ आदी उपस्थित होते.