esakal | कोकणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ‘भीक मांगो’आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

bhik mago movement of Akhil Bharatiya Vidyarthi Parishad in konkan

शैक्षणिक शुल्क विद्यार्थ्यांना 4 टप्प्यांमध्ये भरण्याची मुभा देण्याची मागणी अभाविपने केली

कोकणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ‘भीक मांगो’आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : शिक्षण संस्थांकडे चालू वर्षीचे शैक्षणिक प्रवेश शुल्क एकरकमी भरण्याला विरोध करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने कोकणात सर्वत्र ‘भीक मांगो’आंदोलन केले. लॉकडाऊनमुळे बर्‍याच पालकांच्या रोजगाराच्या समस्या निर्माण झाल्याने आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. तरीसुद्धा अनेक महाविद्यालय संपूर्ण फी भरायला विद्यार्थ्यांना भाग पाडत आहेत. याविरोधात परिषदेने रत्नागिरीसह कोकणात विविध ठिकाणी तीव्र आंदोलन केले.

हेही वाचा - जाणून घ्या, डाव्या हाताने आशीर्वाद देणाऱ्या जर्मन गणेशमुर्ती विषयी...

कोविड- 19 च्या काळात सर्वच क्षेत्राप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रातही खूप मोठ्या प्रमाणात समस्या झाल्या आहेत. विविध शैक्षणिक समस्यांबाबत वेळोवेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने राज्य शासनाचे विद्यापीठाचे लक्ष वेधले. शैक्षणिक शुल्क एकरकमी भरण्यास कोणीही विद्यार्थी तयार नाहीत. याविरोधात आंदोलन केले. शैक्षणिक शुल्क विद्यार्थ्यांना 4 टप्प्यांमध्ये भरण्याची मुभा देण्याची मागणी अभाविपने केली. 

सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता शैक्षणिक शुल्कामध्ये 30 टक्के कपात करावी. विद्यार्थी ज्या सोयी सुविधांचा वापर करत नाही त्याचे शुल्क आकारण्यात येऊ नये. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या नाहीत, त्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यात यावे, अशा मागण्या अभाविपने केल्या. या सर्व मागण्यांसाठी कोकण प्रांतातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘भीक मांगो’आंदोलन झाले. 

रत्नागिरीत मुंबई विद्यापीठाविरोधात भीक मांगो आंदोलन झाले. या वेळी अभाविप दक्षिण रत्नागिरी जिल्हा संयोजक राहुल राजोरीआ, द. रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी सदस्य इशा फाटक, रत्नागिरी तालुका प्रमुख स्वरूप काणे, जीवन जाधव, संकेत मुळे, अभिजीत सावंत हे कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा - नियती कोणाला सोडत नाही ; निलेश राणेंकडून पुन्हा ठाकरे कुटुंबावर निशाना...

“वारंवार निवेदने देऊन, भेटूनसुद्धा हा प्रश्न मार्गी न लागल्याने विद्यार्थी परिषदेने विद्यापीठाविरोधात ‘भीक मांगो’ आंदोलनाचे पाऊल उचलले. जोपर्यंत हे प्रश्‍न मुंबई विद्यापीठ सोडवत नाही, तो पर्यंत विद्यार्थी परिषद विद्यार्थी हितासाठी लढत राहील.”

- प्रेरणा पवार, कोकण प्रदेश मंत्री, अभाविप

संपादन - स्नेहल कदम 

loading image