परळीत भीम जयंतीनिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम, भव्य मिरवणुक

अमित गवळे
सोमवार, 16 एप्रिल 2018

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील भिमशक्ती मित्रमंडळ व माता रमाई महिला मंडळ भिमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने भिमनगर परळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 127 व्या जयंती निमित्त विविध सामाजिक, धार्मीक, प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील भिमशक्ती मित्रमंडळ व माता रमाई महिला मंडळ भिमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने भिमनगर परळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 127 व्या जयंती निमित्त विविध सामाजिक, धार्मीक, प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भारतीय संविधानाच्या योग्य अंमलबजावणी अभावी आज देश धर्मांधता, जातीयता व अराजकतेच्या वाटेवर आहे. प्रत्येक समाज घटक अस्वस्थ होऊन आपल्या न्यायहक्कासाठी रस्त्यावर उतरत आहे. आज आंबेडकरी बहूजन समाजासमोर देखील अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. संविधान व लोकशाही धोक्यात आली आहे. त्यामुळे सर्वांनी एकसंघ व सतर्क होवून संविधानाच्या रक्षणासाठी जागरुकपणे व्यापक स्वरुपाचा लढा उभारणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक तथा विचारवंत किरण गायकवाड यांनी अभिवादन सभेत केले.

यावेळी गावातून वाद्यवृदांच्या गजरात, फटाक्यांच्या अातिषबाजीत व भीम घोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. विद्युत रोषणाईने सजविलेल्या भीमरथ मिरवणुकीत शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई, संदेश कुंभार, पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड, पोलीस निरिक्षक दशरथ पाटील आदिंसह विवीध क्षेत्रातील मान्यवरांनी महामानवाला अभिवादन केले. भिमजयंत्ती महोत्सवानिमित्त सायंकाळी आयोजीत अभिवादन सभेत बहुजन महापुरुषांच्या जिवनावर अभ्यासपुर्ण व्याख्याने व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास प्रभाकर गायकवाड, दिपक पवार, राजेश गायकवाड, भा.रिप बहुजन महासंघाचे जिल्हा प्रवक्ते एम.डी.कांबळे, प्रभाकर शिंदे, रि.पा.इं सुधागड तालुकाध्यक्ष राहूल सोनावळे, स्वाभिमानी रिपब्लीकन पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख सेवक जाधव,स्वाभिमानी रि.प सुधागड तालुकाध्यक्ष संदेश भालेराव,उद्योजक संदेश कुंभार, उद्योजक सतिष देसाई,एम.वाय.गायकवाड, मारुती साळुंके, अॅड. प्रविण कुंभार,दिपक गायकवाड, धम्मशिल सावंत, आदिंसह मान्यवर धम्मबांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रुपेश साळुंके यांनी भुषविले तर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष नितेश गायकवाड हे होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिलीप जाधव, भावेश गायकवाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन योगेश गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भिमशक्ती मित्रमंडळाचे अध्यक्ष दिपक म. गायकवाड,उपाध्यक्ष सुमीत वाघमारे, खजिनदार नितेश गायकवाड,सचिव योगेश गायकवाड, तसेच रमाबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा गुलाब गायकवाड, उपाध्यक्ष रुपाली गायकवाड, सचिव सुवर्णा वाघमारे, खजिनदार रेखा जाधव आदिंसह पदाधिकारी, सभासद व ग्रामस्तांनी मेहनत घेतली.

Web Title: bhim jayanti celebrated in parali pali raigad