कोकणातही होणार राजकीय भूकंप? काँग्रेसनेते होणार भाजप-सेनेत दाखल

कोकणातही होणार राजकीय भूकंप? काँग्रेसनेते होणार भाजप-सेनेत दाखल

रायगड : गेल्या आठवडाभर राजकीय नेत्यांच्या पक्षांतराने मोठी खळबळ माजवली होती, त्या तुलनेत कोकणपट्टा शांतच होता. मात्र कोकणातील मोठे नेतेही पक्षांतराच्या चक्रात अडकले असून कोकणातली बरीच मोठी नेतेमंडळी पक्षबदल करणार असल्याची माहिती मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी शरद पवार यांची साथ सोडणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले असले तरी कोकणातील काँग्रेसचे अनेक छोटे-मोठे नेते शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कोकणातील राजकीय गणिते बदलणार आहेत.

राजापूर, खेड, रत्नागिरी परिसरातील स्थानिक कामे होण्यासाठी काँग्रेस पक्षातील काही नेते पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत, काँग्रेस पक्षाच्या महिला विधानपरिषद सदस्याही स्वगृही परतणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कोकणातील एकूणच राजकीय गणिते बदलणार असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, विखेंपासून काँग्रेस राष्ट्रवादीला लागलेली गळती आता सचिन अहिर, पिचड पितापुत्र, चित्रा वाघ आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या रूपाने अजूनच वाढली आहे.

दरम्यान, राजू शेट्टी यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नुकतीच भेट घेतली, राजू शेट्टी त्या आधी राज ठाकरे यांना भेटले होते, ते नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीच्या लक्ष्मण माने यांनाही भेटणार असल्याच्या चर्चा आहेत, राज्यातल्या स्थानिक प्रादेशिक पक्षांची नवी आघाडी उभी राहिल्यास कोकणच त्याचा केंद्रबिंदू असेल हे निश्चित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com