बाईक अ‍ॅम्ब्युलन्स ठरतेय दुर्गम भागासाठी 'वरदान'

बाईक अ‍ॅम्ब्युलन्स ठरतेय दुर्गम भागासाठी 'वरदान'

मोखाडा : आरोग्य विभागाने आॅगस्ट महिन्यात बाईक अ‍ॅम्ब्युलन्स सेवा पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागाकरीता उपलब्ध करून दिली असून, रहदारीच्या आणि दुर्गम भागात तातडीने रूग्णसेवा मिळण्यासाठी याचा फायदा येथील रूग्णांना होत आहे. अवघ्या दोन महिन्यात जव्हार तालुक्यातील नांदगांव प्राथमिक आरोग्य केंद्रातील बाईक अ‍ॅम्ब्युलन्सने 75 विविध रूग्णांची मदत केली तर पालघर जिल्ह्यात  250  रूग्णांची मदत केली असल्याची माहिती 108 अ‍ॅम्ब्युलन्सचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. अजमल खान यांनी दिली आहे. 

पालघर जिल्ह्यात अतिदुर्गम डोंगराळ भागात रूग्णांची चांगलीच हेळसांड नेहमीच होत असते. खेडोपाड्याकडे जाणारा रस्ता शक्यतो कच्चा असतो, तसेच काही ठिकाणी रस्ता नसतो, तर काही ठिकाणी पायवाटच असते, तसेच खेडोपाड्यावरील प्राथमिक आरोग्य केंद्राची परिस्थिती दयनिय अवस्थेत असल्यामुळे कित्येक रूग्णांना आपला जिव गमवावा लागला आहे. 

खेडोपाड्यात दूषित पाणी, हवामान, वातावरण अशा विविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर रूग्ण आढतात. बाईक अ‍ॅम्ब्युलन्सने आतापर्यंत ताप, अशक्तपणा, इजा, अंगदुखी, एएनसी तपासणी व अपघात या प्रकारचे जव्हार तालुक्यातील नांदगांव प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळालेली एकमेव अ‍ॅम्ब्युन्सने तालुक्याताल  75 तर जिल्ह्यात  275 रूग्णांची तपासणी करून तातडीचा उपचार यशस्वी केलेला आहे. त्यामुळे या भागात बाईक अ‍ॅम्ब्युलन्सची खूपच गरज भासत आहे. ही बाईक अॅम्ब्युलन्स ही ग्रामीण भागासाठी वरदान ठरत आहे.

तालुक्याची लोकसंख्या पाहता किमान 3 बाईक अ‍ॅम्ब्युलन्स येथे असणे गरजेचे आहे. एक शहरासाठी तर दोन ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा म्हणून याचा खूपच फायदा होणार आहे. शहराच्या परिसरात एकदिवसाआड छोटे मोठे अपघात होत असतात. मात्र, अशावेळी तातडीने मदत मिळणेकरीता शहरात बाईक अ‍ॅम्ब्युन्सची खूपच गरज भासत आहे. तसेच तालुक्यात चारीही बाजूला अतिदुर्गम भाग असल्याने किमान तीन बाईक असने गरजेचे आहे. त्यामुळे बाईक अ‍ॅम्ब्युलन्सची संख्या वाढवावी अशी मागणी होत आहे. 

अशी मिळेल आपल्याला अ‍ॅम्ब्युलन्स

108 क्रमांकावर प्रथम फोन केल्यावर हे कॉल अ‍ॅम्ब्युलन्स व बाईक अ‍ॅम्ब्युलन्स दोंघांना कॉलसेंटरद्वारे फोन जातील. तेथून अपघाताची किंवा अत्यावश्यक उपचाराकरीता रूग्णांची माहिती आपल्याला द्यावी लागेल. त्यानुसार 25 ते 30 किलोमीटरदरम्यान रूग्णाला किती तातडीने उपचार देणे आहे फोनवर दिलेल्या माहितीवरून डॉक्टरांना कळविले जाते. त्यानुसार बाईक अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन उपलब्ध बी. ए. एम.एस. डॉक्टर थेट रूग्ण असलेल्या ठिकाणावर पोहोचतील व प्रथमोपचार केल्यानंतर मागून येणाऱ्या रूग्णवाहिकेसोबत पुढील उपचाराकरीता शासकिय रूग्णालयात दाखल करतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com