"अपना बुथ सबसे मजबुत' ठेवण्यासाठी भाजप कार्यकर्त्ये कामाला

"अपना बुथ सबसे मजबुत' ठेवण्यासाठी भाजप कार्यकर्त्ये कामाला

वैभववाडी - युती होईल किंवा नाही, उमेदवारी कुणाला द्यायची, हा पक्षश्रेष्ठींना अधिकार आहे; मात्र बुथप्रमुख अणि शक्तीकेंद्रप्रमुखांनी "अपना बुथ सबसे मजबुत' ठेवण्याच्या दृष्टीने कामाला लागले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत कणकवली विधानसभा मतदारसंघ जिंकायचा आहे, असा निर्धार आज भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी केला. 

भाजपच्यावतीने जिल्ह्यात 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट या कालावधीत संघटनपर्व - सदस्यता अभियान राबविले जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यातील बुथप्रमुख, शक्तीकेंद्रप्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्ता मेळावा येथील माधवराव पवार कोकिसरे विद्यालयाच्या सभागृहात झाला.

या मेळाव्याला जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी आमदार अजित गोगटे, अतुल रावराणे, संदेश पारकर, विलास हडकर,राजेंद्र राणे, लक्ष्मण रावराणे, प्रज्ञा ढवण, सुधीर नकाशे, अक्षता डाफळे, गीता कामत, सज्जन रावराणे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला जिल्हाध्यक्ष जठार यांची पर्यटन महामंडळांच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. 

जिल्हाध्यक्ष जठार म्हणाले, ""प्रत्येक बुथप्रमुखाने बुथवर सक्षम 25 कार्यकर्ते तयार करावेत. संघटनपर्वाच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पोचणार आहोत. सरकारच्या योजना लोकांपर्यत पोचल्या आहेत किंवा नाही. सरकार आणि पदाधिकाऱ्यांबद्दल जनतेचे मत काय आहे, याची माहिती या अभियानाच्या माध्यमातून घ्यायची आहे. फळाची अपेक्षा न ठेवता कार्यकर्त्यांनी काम करावे.'' 

अजित गोगटे म्हणाले, ""मनी आणि मसल पॉवरचा वापर करून निवडणुका लढविल्या जातात. निवडणुकीचा ट्रेंडच अलीकडे बदलला गेला आहे; परंतु भाजपचा कार्यकर्ता या वाटेवर अजुनही गेलेला नाही. आपले कुटुंब समजुन कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम करावे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्यावर दिलेली जबाबदारी पार पाडली तर कुठलीच निवडणूक अवघड नाही. आपला शुत्र अर्धमेला झाला आहे. त्याला या निवडणुकीत पुरता नेस्तानुबुत करायचे आहे.''

अतुल काळसेकर म्हणाले, ""केंद्र आणि शासनाने राबविलेल्या विविध विधायक योजनांमुळे लोकांपर्यत पोचलो आहोत; परंतु आता लोकांपर्यत जायला हवे. लोक आपली वाट पाहत आहेत. कार्यकर्त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा विचार करू नये. बुथ मजबुत असेल तरच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जिंकता येतात.''

अतुल रावराणे म्हणाले, ""कणकवली मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. तो कायम अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कार्यकर्त्यांनी भ्रमात राहु नये.''

संदेश पारकर म्हणाले, हा मतदारसंघ पुन्हा जिंकायचा आहे. जिल्ह्यात पक्षाचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी भाजपचा आमदार निवडून येणे आवश्‍यक आहे. 

कणकवली मतदारसंघ तृतीय श्रेणीत 
सदस्य नोंदणीत जिल्ह्यात सावंतवाडी मतदारसंघ हा प्रथम श्रेणीत आहे; परंतु भाजपची खरी ताकद असलेल्या कणकवली मतदारसंघ हा तृतीय श्रेणीत आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपाच्या चर्चेत हा मतदारसंघ तुमच्या हातुन जावु शकतो, असा इशारा मतदारसंघाचे विस्तारक विलास हडकर यांनी कार्यकर्त्यांना दिला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com