नारायण राणेंची हकालपट्टी करण्याची सिंंधुदुर्ग भाजपची मागणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

कणकवली - भाजपकडून खासदारकी घ्यायची आणि उलट पक्षावरच टीका करायची अशांना भाजप पक्षात स्थान नाही. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करणाऱ्या नारायण राणेंची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी आपण राज्य प्रभारींकडे केली आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी  दिली.

कणकवली - भाजपकडून खासदारकी घ्यायची आणि उलट पक्षावरच टीका करायची अशांना भाजप पक्षात स्थान नाही. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करणाऱ्या नारायण राणेंची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी आपण राज्य प्रभारींकडे केली आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी  दिली.

आपण दोन महिने जिल्ह्यात नव्हतो. अन्यथा यापूर्वीच राणेंच्या हकालपट्टीचा ठराव जिल्हा कार्यकारिणी बैठकीत घेतला असता; मात्र यापुढे त्यांनी भाजपच्या नेतेमंडळींवर किंवा सरकारवर टीका केली तर जिल्हा भाजपची बैठक बोलावली जाईल आणि त्यात राणेंच्या हकालपट्टीचा ठराव घेऊन तो राष्ट्रीय अध्यक्षांकडे पाठविणार असल्याचेही  जठार म्हणाले. येथील भाजप संपर्क कार्यालयात जठार यांनी पत्रकार परिषद घेतली. जिल्हा सरचिटणीस रवींद्र शेट्ये उपस्थित होते.

श्री. जठार म्हणाले, ‘‘राणेंनी नुकतीच जिल्ह्यात विश्‍वासयात्रा काढली. यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यांना जर टीका करायचीच असेल तर त्यांनी आधी सन्मानाने राजीनामा द्यावा. त्यांच्या हकालपट्टीबाबतची मागणी आम्ही राज्यप्रभारी सरोजिनी पांडे यांच्याकडे केली आहे.’’

विरोधकच रिफायनरीच्या बाजूने असतील 
नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्प ज्यांनी अडवला तेच येत्या काळात हा प्रकल्प करा असे सांगताना तुम्हाला पुढे दिसतील, असा दावाही प्रमोद जठार यांनी या वेळी केला.

छत्रपतींचा पुतळा सुरक्षित ठेवावा
तेलीआळी येथील महामार्गालगत असलेल्या छत्रपतींच्या पुतळ्याची जागा अद्याप निश्‍चित झालेली नाही. त्यावर सर्वसहमतीने तोडगा निघेपर्यंत छत्रपतींचा पुतळा पोलिसांनी ताब्यात घेऊन सुरक्षित ठेवावा. तसेच पुतळा प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवणे चुकीचे असल्याचे जठार म्हणाले.

Web Title: BJP demands to exit Narayan Rane