Vidhan Sabha 2019 : सेनेला भाजपच्या मतांची गरज वाटत नाही का ? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

शिवसेनेच्या उमेदवाराकडून निवडणूक जाहीर झाल्यापासून आजतागायत कुठलाही संपर्क भारतीय जनता पक्षाचा पदाधिकाऱ्यांशी झालेला नाही, तसेच अपक्ष उमेदवार म्हणून माझ्याशी उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत संपर्क केलेला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराला भाजप मतांची गरज नाही, असा मेसेज ते देत आहेत, असे मत भाजपचे जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 

दाभोळ - शिवसेनेच्या उमेदवाराकडून निवडणूक जाहीर झाल्यापासून आजतागायत कुठलाही संपर्क भारतीय जनता पक्षाचा पदाधिकाऱ्यांशी झालेला नाही, तसेच अपक्ष उमेदवार म्हणून माझ्याशी उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत संपर्क केलेला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराला भाजप मतांची गरज नाही, असा मेसेज ते देत आहेत, असे मत भाजपचे जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 

शिवसेनेच्या उमेदवारासाठी मी अर्ज मागे घेतलेला नसून पक्षाचा आदेश या एका कारणास्तव मी निवडणुकीतून माघार घेतली आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार तसेच भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार दापोली विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे स्पष्टीकरण साठे यांनी दिले. 

केदार साठे यांनी या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार तसेच अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता; मात्र पक्षाच्या उमेदवारी अर्जासोबत त्यांनी एबी फॉर्म न जोडल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला, तर अपक्ष उमेदवारी अर्ज वैध ठरला होता.

साठे म्हणाले, निव्वळ भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा आदेश आल्याने अर्ज मागे घेतला आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीराम (भाऊ) इदाते, मंडणगडचे तालुकाध्यक्ष सचिन थोरे, माजी तालुकाध्यक्ष बावाशेठ केळसकर, तालुका उपाध्यक्ष, महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस स्मिता जावकर आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP district general secretary Kedar Sathe question