बाळ मानेविरोधकांना पक्षाकडून धोबीपछाड

बाळ मानेविरोधकांना पक्षाकडून धोबीपछाड

संगमेश्‍वर -  गेल्या तीन वर्षात केलेल्या समाधानकारक कामाच्या जोरावर भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांना पक्षाने मुदतवाढ दिली आहे. यामुळे गेले काही महिने सुरू असलेल्या माने हटाओ मोहिमेला ब्रेक लागला आहे. मानेंनी आपल्या ताकदीने पक्षांतर्गत विरोधकांना धोबीपछाड दिल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

भाजपच्या घटनेनुसार रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांची ३ वर्षांची मुदत १५ जानेवारी रोजी संपली. मानेंच्या कारकिर्दीत तीन वर्षांपूर्वी भाजपने सेनेला धोबीपछाड देत देवरूख नगरपंचायत ताब्यात घेतली. त्यानंतर चिपळूण आणि देवरूख नगरपालिकेत भाजपचे कमळ फुलविले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पक्षाला जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या बरोबरीत आणून बसवले. सूर्यकांत साळुंखे, राजेश सावंत, टी.जी. शेट्ये, शशिकांत चव्हाण, प्रमोद अधटराव, रश्‍मी कदम, संजय गांधी, सुरेखा खेराडे, अमजद बोरकर, विवेक सुर्वे, राजु भाटलेकर, धाडवे, यांच्यासह बरेच बहुजन नेते या दरम्यान पक्षात आल्याने भाजपची ताकद वाढली.  

मानेंची मुदत संपत असल्याने काहींनी जिल्हाध्यक्षपदाला बाशिंगही बांधले होते. मात्र, प्रदेश भाजपने या सर्वांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. मानेंना डिसेंबर १९ पर्यंत मुदतवाढ जाहीर करण्यात आली. याच काळात लोकसभा, विधानसभा निवडणुका होणार आहेत. 

आगामी निवडणुकीच्या दृष्टीने माने हेच जिल्हाध्यक्षपदी राहणे पक्षासाठी फायद्याचे होते. गेल्या ३ वर्षांत त्यांनी चांगले काम केले. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत भाजपची ताकद पुन्हा सिध्द होईल.
- जाकिर शेकासन,
अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com