भाजपला जागा सोडणार नाही - आमदार गोगावले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

रागड जिल्हा परिषदेत शिवसेनेची एकहाती सत्ता येईल, असा आत्मविश्‍वास नेत्यांना आहे...
महाड - महाड, पोलादपूर व माणगाव तालुक्‍यात भाजपसोबत युती केली जाणार नसून ११ जिल्हा परिषद गटांतील एकही जागा भाजपला सोडणार नाही, असे आमदार भरत गोगावले यांनी पाचाड येथील मेळाव्यात स्पष्ट केले. 

भाजपसाठी पंचायत समितीच्या एखाद्या जागेबाबत विचार केला जाईल, असे ते म्हणाले. रायगडावरील जगदीश्‍वर मंदिरात जगदीश्‍वराला साकडे घालून शिवसेनेने जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ नुकताच गोगावले यांच्या हस्ते फोडला.
या वेळी युवा सेना अधिकारी विकास गोगावले, जिल्हाप्रमुख रवी मुंढे, तालुकाप्रमुख सुरेश महाडिक, पोलादपूर तालुकाप्रमुख नीलेश अहिरे, माणगाव तालुकाप्रमुख अनिल नवगणे, जिल्हा परिषद सदस्य सुरेश कालगुडे, बाळ राऊळ, चंद्रकांत कळंबे, नीलेश ताठरे, सभापती दीप्ती फळसकर, तुकाराम गुडेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार उपस्थित होते. त्यानंतर पाचाड येथे कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. जिल्हा परिषदेत शिवसेनेची एकहाती सत्ता येईल. महाड, पोलादपूर व माणगावमधील जि.प.च्या ११ जागा व पंचायत समितीच्या २२ जागा शिवसेना जिंकेल, असा विश्‍वास गोगावेले यांनी व्यक्त केला.

जिल्हाप्रमुख रवी मुंढे म्हणाले की, शिवसेनेची खूप मोठी ताकद महाड - पोलादपूरमध्ये असल्याने खासदारकी, आमदारकीप्रमाणेच जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना विजय संपादन करेल. शिवसेनेशी एकनिष्ठ राहणाऱ्यांना उमेदवारीत प्राधान्य दिले जाईल. गद्दारी करणाऱ्यांना गावामध्ये थारा देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: BJP does not leave space