ईडीचा गैरवापर काँग्रेसच्या काळात जास्त झाला:देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 December 2020

महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांची घोर फसवणूक केली

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांची घोर फसवणूक केली आपण राज्याचा दौरा केला असून  निसर्ग चक्रीवादळात जाहीर केलेली तुटपुंजी मदतही अद्याप पर्यंत मिळालेले नाही अशी टीका भाजपा नेते माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.तर ईडीचा गैरवापर हा काँग्रेसच्या काळात जास्त प्रमाणात झाला त्यामुळे त्यांचा काळ त्यांना आठवत असल्याने ते भाजपवर आरोप करीत आहेत असेही ते म्हणाले.गोव्याच्या खासगी दौऱ्यावर असलेल्या भाजप नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे सावंतवाडीत
 जिल्हा भाजपच्यावतीने भव्य स्वागत करण्यात आले. 

माजी राज्यमंत्री आ. रविंद्र चव्हाण व आ. नितेश राणे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले राज्य सरकार कडून शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत कुठलीही मदत मिळालेली नाही. आपण अलीकडेच केलेल्या राज्याच्या दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांशी हितगुज साधले आहे. यामध्ये त्यांनी राज्यसरकार बाबत तीव्र असंतोष व्यक्त केला. निसर्ग चक्रीवादळात ही घोषणा केलेली तुटपुंजी मदत अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. त्यामुळे महाआघाडी सरकार हे फसवे सरकार असल्याचे ते म्हणाले.

राज्य सरकारचे बांधकाम घोटाळे आपण उघडकीस आणले आहेत, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आपण राज्य सरकारकडे केली आहे त्यांनी कारवाई न केल्यास  आपण उच्च न्यायालयात जाणार आहे. मात्र ईडी वरुन काँग्रेस कडून भाजपावर केले जात असलेले आरोप हास्यास्पद असून ईडीचा गैरवापर हा जास्त प्रमाणात काँग्रेसच्या काळात पाहायला मिळाला, ज्यांच्याबद्दल तक्रारी पुरावे असतील त्यांची फक्त चौकशी केली जाते मात्र संबंधित एजन्सी कोणावरही कुठेच थेट कारवाई करत नाही त्यामुळे कोणी घाबरण्याचे कारण नाही असे ते म्हणाले.

हेही वाचा- पहिल्या लग्नाची माहिती लपवून तरुणीशी दुसरे लग्न करून केली २९ लाखांची फसवणूक -

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, नगराध्यक्ष संजु परब, शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे, युवा नेते विशाल परब, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत, उपाध्यक्ष सुक्ष्मित बांबोळकर, सोशल मिडीया जिल्हा प्रमुख अविनाश पराडकर, राजेश पडते, राजू राऊळ, विनोद राऊळ, सभापती, गटनेते राजू बेग, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, मनोज नाईक, निशांत तोरसकर, महिला शहर अध्यक्षा मोहीनी मडगावकर, परिणीती वर्तक, दिलीप भालेकर, गुरुनाथ सावंत, निशांत तोरसकर,नगरसेविका  दिपाली भालेकर,समृद्धी विर्नोडकर, उत्कर्षा सासोलकर, मिस्बा शेख,ज्योती पाटणकर,दीप्ती माठेकर,नेत्रा मुळये,केतन आजगावकर, बंटी पुरोहित, संजू विर्नोडकर, सुधाकर राणे, लवू भिंगारे, परिक्षीत मांजरेकर, हेमंत बांदेकर, गोविंद प्रभू, दिनानाथ नाईक, अमित परब आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader former Chief Minister and Leader of Opposition Devendra Fadnavis visit for sindhudurg