विनायक राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला भाजपाने पाजले पाणी : राणे यांच्यावरील टीकेला दिले प्रत्युत्तर

BJP office bearers symbolic statue of Raut political  kokan marathi news
BJP office bearers symbolic statue of Raut political kokan marathi news

रत्नागिरी : माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे आणि भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्यावर खा. विनायक राऊत आणि शिवसेनेकडून होणाऱ्या टीकेला रविवारी रत्नागिरीमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांनी खा. राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला पाणी पाजून निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरात रविवारी दुपारी भाजपा कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी शिवसेनेच्या कृतीचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली.

 शिवसेनेच्या कृतीला भाजपाकडून जशास तसे उत्तर देत भाजपा पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मारुती मंदिर येथे खा. विनायक राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला पाणी पाजून जोडे मारले. तसेच शिवसेनेचा निषेध करतानाच खा. राणे आणि निलेश राणे यांच्या जयजयकार करण्यात आला.यावेळी जिल्हा सरचिटणीस राजेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, पदाधिकारी पिंट्या निवळकर, उपतालुकाध्यक्ष अशोक वाडेकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नंदू चव्हाण, मेहताब साखरकर, ययाती शिवलकर, रामा शेलटकर, अक्षय चाळके, अमर किर, शोएब खान, गुरुनाथ चव्हाण, रमाकांत आयरे, सर्वेश सावंत, पप्पू सरफरे, इंतिखाब पठाण, भाई परपते, मन्सूर मुकादम ,वल्लभ सरफरे,मनोज तांडेल, आशु सावंत, साहिल पवार, विशाल पाटील, राजेश झगडे, महिला पदाधिकारी शोभा जीरोळे,विद्या सुर्वे, सोनल चाळके, जयश्री भंडारी आदी उपस्थित होते.


 ज्या प्रमाणे खा. नारायण राणे यांनी कोकणात विकास घडवला त्याप्रमाणेच शिवसेनेनेही त्यांच्यावर अशी टीका करण्यापेक्षा विकासकामांवर बोलावे, हीच अपेक्षा आम्ही दोन दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. पण तरीही खा. विनायक राऊत आणि शिवसेना जागी होत नसेल तर आम्हीही खा. राणे आणि प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्यावरील टीकेला जशास तशा पद्धतीने उत्तर देऊ.

राजेश सावंत 

माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या विरोधातील शिवसेनेच्या प्रत्येक कृतीला आम्ही जशास तसे उत्तर देऊ.

अनिकेत पटवर्धन 

 माजी खासदार निलेश राणे यांच्या निषेध करताना शिवसेनेने महिलांना पुढे करून स्वतः मागे राहण्यात धन्यता मानली, या वरूनच त्यांचे आमच्या साहेबांवर किती प्रेम आहे हे दिसून येतेय. पण आज खा. राऊत यांच्या पुतळ्याला पाणी पाजलं असून 2024 ला पराभूत करून प्रत्यक्षात पाणी पाजले जाईल.

संजय निवळकर

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com