सूर्यकांत दळवींसाठी भाजपचा गळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

शिवसेनेत नाराज - कदम-दळवी संघर्षाचा फायदा उठविण्याचा प्रयत्न

चिपळूण - दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना भाजपमध्ये घेण्यासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष गळ टाकून आहेत. दळवी भाजपमध्ये येणार असतील, तर त्यांचे स्वागत करू, असे सूचक विधान बाळ माने यांनी आज चिपळूणमध्ये केले. दळवी व रामदास कदम यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे. दळवी सेनेत नाराज आहेत. पक्षातूनच त्यांच्यावर टीका होत आहे. त्यामुळे भाजप संधीची वाट पाहत आहे. 

दापोली विधानसभा मतदारसंघात दळवी यांचे आजही मोठ्या प्रमाणावर अनुयायी आहेत. ‘माझ्या कार्यकर्त्यांना पक्षात न्याय दिला जात नाही. एखादा निर्णय घेताना मला विचारले जात नाही. रामदास कदम यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना पदे वाटली जातात. अनेक निर्णय परस्पर घेतले जातात, अशी दळवींची तक्रार आहे. दळवींना शह देण्यासाठी कदमांचे चिरंजीव योगेश कदम यांना दापोली विधानसभा मतदारसंघासाठी पुढचा उमेदवार घोषित करण्यात आले आहे. नगरपंचायत निवडणुकीवेळीही योगेश कदम यांना मोठा रोल करायला मिळाला. स्वीकृत नगरसेवकांची निवड करताना दळवींना डावलण्यात आले. तसेच तालुकाध्यक्ष नेमण्यावरूनही दळवी नाराज आहेत. त्यांचा विरोध असलेल्यांना पद देण्यात येत आहे. त्यानंतर नाराज दळवी मनसेच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू होती. कार्यकर्ते ओला चारा दिसेल, त्याठिकाणी धावतात असे सांगून त्यांनी आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

मागील चार दिवसांत रामदास कदम आणि दळवी यांच्यात वाक्‌युद्ध सुरू आहे. या नाराजीचा फायदा भाजप उठविण्याच्या तयारीत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर भाजपला वर्चस्व मिळवायचे आहे. त्यासाठी इतर पक्षांत नाराज असलेल्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे. चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्‍चित झाला आहे.

भाजपकडे नेते वळले
मंडणगडचे माजी सभापती अनंत लाखण, चिवेलीचे दिनेश शिर्के, निर्व्हाळचे दीपक सावंत, गुहागरचे सुरेश सावंत, खेडचे नंदू कांबळी आदींचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. सूर्यकांत दळवी भाजपमध्ये आले, तर खेड, दापोली, मंडणगडसाठी पक्षाला मोठा नेता मिळेल. या पार्श्‍वभूमीवर भाजपने दळवींसाठी गळ टाकला आहे.

Web Title: bjp planning for suryakant dalvi