सिंधुदुर्गात युतीवर शिक्कामोर्तब

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

सावंतवाडी : सिंधुदुर्गात कॉंग्रेसला शह देण्यासाठी शिवसेना-भाजप युती करावी, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. युती करण्याच्या सूचना आज खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिल्या; मात्र जागा वाटपाच्या तिढ्यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठकांचा सिलसिला सुरूच आहे.

सावंतवाडी : सिंधुदुर्गात कॉंग्रेसला शह देण्यासाठी शिवसेना-भाजप युती करावी, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. युती करण्याच्या सूचना आज खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिल्या; मात्र जागा वाटपाच्या तिढ्यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठकांचा सिलसिला सुरूच आहे.

जिल्ह्यात कॉंग्रेसला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शह द्यायचा असल्यास युतीशिवाय पर्याय नसल्याचे दोन्ही पक्षांच्या लक्षात आले आहे. यामुळे युती करावी, यावर शिक्कामोर्तब झाले. पहिल्या टप्प्यात 39 जागांवर दोन्ही बाजूने एकमत झाले आहे. चार जागांसंदर्भात निर्णय अंतिम टप्प्यात आहे, मात्र कोलगाव, नेरुर, माटणे, फोंडाघाट आदींसह एकूण सात जागांसंदर्भातील तिढा कायम आहे. यासाठी काल व आज पुन्हा बैठका झाल्या.
आज गोव्यात आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनीही युती करण्याच्या सूचना केल्या. जागा वाटपाचा तिढा इतक्‍यात सुटला नाही तर जेथे एकमत झाले त्या जागांची यादी आधी जाहीर होण्याची शक्‍यता आहे. येत्या तीन दिवसांत पहिली यादी जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

याबाबत भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली म्हणाले, ""जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर युतीत 39 जागांवर एकमत झाले आहे तर अन्य अकरा जागांवर चर्चा सुरू आहे. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. आज मी आणि खासदार विनायक राऊत यांच्यासमवेत चर्चा झाली. अकरा जागांबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. काहीही झाले तरी त्यातून मार्ग काढण्यात येईल. चर्चेतून प्रश्‍न न सुटल्यास ह्या जागांवर कोणाची जास्त ताकद आहे. या बाबतचा अखेरचा निर्णय खासदार विनायक राऊत आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण घेणार आहेत.
ते म्हणाले, ""आज गोवा येथे मुख्यमंत्र्यांशी युतीबाबत चर्चा करण्यात आली. तेही युतीसाठी आग्रही आहेत. या वेळी झालेल्या चर्चेत राज्यमंत्री चव्हाण, खासदार राऊत, अतुल काळसेकर, आमदार वैभव नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्र्यांनीही चर्चेतून प्रश्‍न सोडवा, असे त्यांनी सांगितले आहे.''

Web Title: bjp sena alliance in sindhudurg