भाजपकडून काँग्रेस लक्ष्य

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

सावंतवाडी - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे कार्यकर्ते पक्षात खेचण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेस-शिवसेना अशी लढत होणार असली तरी काँग्रेसमधील ताकदवान नेते भाजपमध्ये आणण्यासाठी त्यांच्याकडून सुरू असलेली मोर्चेबांधणी काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत आहे.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आलेले माजी आमदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी काँग्रेसला धक्का देण्यास सुरवात केली आहे. यासाठी तालुकाध्यक्ष मनोज नाईक आणि नुकतेच प्रवेशकर्ते झालेल्या महेश सारंग हेही प्रयत्न करताना दिसत आहेत.

आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांत येथील विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे हे चित्र अंतिम मानले जात आहे. निवडणुकीच्या काही दिवस युतीचे दोर थेट राज्यातून कापण्यात आल्याने युतीच्या भरवश्‍यावर अवलंबून असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आयत्यावेळी उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. यामुळे आता शिवसेना आणि जास्तीत जास्त काँग्रेसमधील नाराज चेहरे आपल्याकडे ओढून त्यांना तिकिटे देण्याचा फॉर्म्युला भाजपकडून राबविण्यात येत आहे. सद्यस्थितीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपची म्हणावी तशी ताकद नाही. परंतु या मतदारसंघाची जबाबदारी दिलेल्या श्री. तेली यांनी आपल्याला विधानसभा लढविताना सोपे व्हावे या दृष्टीने आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात आणि केंद्रात असलेल्या सत्तेचा फायदा घेऊन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यात भाजपची ताकद वाढविण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे.

त्यात काही झाले तरी कार्यकर्त्यांना ताकद देण्याची तयारी त्यांनी दाखविली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला तिकीट मिळेल आणि जास्तीचा खर्च करावा लागणार नाही हे चित्र समोर दिसत असल्यामुळे अनेकजण इच्छुक आहेत. 
 
तेलींचा पुढाकार
दरम्यान, पक्षाकडून योग्य तो पाठिंबा मिळत असल्याचा फायदा घेऊन तेली यांच्यासह कार्यकर्ते पक्ष बळकट करण्यास सुरवात केली आहे. पंचायत समिती उपसभापती महेश सारंग व आंबोली येथील सुशीला गावडे यांच्या प्रवेशानंतर आता तळवडे येथील काँग्रेसचे कार्यकर्ते बाळू साळगावकर यांनी प्रवेश केला आहे. शिवसेनेचे माजगाव येथील कार्यकर्ते संदीप सावंत, हेलन निब्रे यांना पक्षात प्रवेश देऊन थेट उमेदवारी देण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत सातार्डा, आरोंदा आणि आंबोली, कलंबिस्तमधील मोठे मासे गळाला लागणार आहेत, असा दावा तालुकाध्यक्ष मनोज नाईक यांनी केला आहे. एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता भाजपकडे जरी जोरदार इनकमिंग सुरू असले तरी यातील बरेचसे कार्यकर्ते हे काँग्रेसमधीलच आहेत. यामुळे काँग्रेसला फटका बसण्याची शक्‍यता आहे.

Web Title: bjp target to congress