वैभववाडीत भाजपची विजयी रॅली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

वैभववाडी - वैभववाडी पंचायत समितीची सत्ता हस्तगत केलेल्या भाजपने बुधवारी शहरातून सवाद्य मिरवणूक काढली. शासकीय विश्रामगृह ते पंचायत समितीपर्यंत काढलेल्या मिरवणुकीत वाहनांचा ताफा, नेते व कार्यकर्त्यांचा लक्षणीय सहभाग होता. मिरवणुकीत घोषणाबाजी व जागोजागी फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली.

ढोलपथकाच्या गजरात सार्वजनिक बांधकामच्या विश्रामगृहापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. सभापतींच्या दालनात भाजप कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. सभापतिपदी विराजमान झालेले लक्ष्मण रावराणे यांना 
कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे भाजप-शिवसेना युतीच्या विजयाच्या घोषणाही देण्यात आल्या.

यावेळी बंडू मुंडल्ये, अतुल रावराणे, जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, पंचायत समिती सदस्या अक्षता डाफळे, सज्जनराव रावराणे, नंदू शिंदे, रमेश तावडे, सुहास सावंत, संतोष बोडके, स्नेहलता चोरगे, सीमा नानिवडेकर, हिरा पाटील, रंगनाथ नागप, उत्तम सुतार, किशोर दळवी, प्रसाद जावडेकर, अनंत फोंडके, श्रीकांत रावराणे, शिवाजी नाटेकर, स्नेहलता रावराणे, सुविधा रावराणे आदी उपस्थित होते.

आम्ही लोकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसने आम्हाला टाकाऊ, सुकलेली झाडं अशा उपमा देऊन खिजवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी आम्ही सर्वांनी कार्यकर्त्यांचे सत्तेचे स्वप्न या वेळी पूर्ण करण्याची जिद्द बाळगली होती. तुमच्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे आमची जिद्द पूर्ण झाली. टाकाऊ लोक, सुकलेली झाडं काय करू शकतात, हे यानिमित्ताने आम्ही टीकाकारांना दाखवून देऊ शकलो.
- बंडू मुंडल्ये
 
सभापती दालनात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अतुल रावराणे म्हणाले, ‘मी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा या निवडणुकीनंतर माझं पार्सल मुंबईला पाठवून देण्याची भाषा सुरू झाली होती, परंतु त्यांनाच येथून जाण्याची वेळ आली. भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे लोरे व कोकिसरे मतदारसंघात आपण चांगले यश मिळवू शकलो. पंचायत समितीच्या माध्यमातून आता विकासाचे राजकारण सुरू झाले आहे.’
- अतुल रावराणे

Web Title: bjp winning rally in vaibhavwadi