कोकणात स्वाभिमानला हाताशी धरून शिवसेनेला बेजार करण्याची भाजपची रणनीती

कोकणात स्वाभिमानला हाताशी धरून शिवसेनेला बेजार करण्याची भाजपची रणनीती

देवरूख - राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना - भाजपमध्ये युतीबाबत गुर्‍हाळ सुरू असताना युती न झाल्यास स्वतंत्रपणे लढण्यासाठी भाजपने रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघाची जबाबदारी विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांच्याकडे दिली आहे.

युती न झाल्यास तळकोकणात स्वाभिमानला हाताशी धरून शिवसेनेला बेजार करण्याचे तंत्र भाजपने अवलंबले आहे. भाजपला यात किती यश येणार हे येत्या काही महिन्यातच स्पष्ट होणार आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. माजी खासदार नीलेश राणेंचा तब्बल दीड लाखांच्या फरकाने पराभव करीत सेनेने हा मतदारसंघ आपल्याकडे आणला. सद्यस्थितीत सिंधुदुर्गात केवळ नितेश राणे वगळता उर्वरित सर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्राबल्य आहे. यामुळे यावेळीही येथील लढत सेनेसाठी सोपी जाणार अशी चर्चा आहे. शिवसेनेने गाफील न राहता मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून युतीची चाचपणी सुरू झाली आहे. सेनेकडून त्याला प्रतिसाद मिळत नाही. गेले सहा महिने आमदर लाड हे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत कार्यरत आहेत. सिंधुदुर्गात राणेंच्या स्वाभिमान रूपाने भाजपला आशा आहे. रत्नागिरीत भाजपची मते वाढली असली तरी ती निर्णायक ठरविण्याच्या दृष्टीने लाड कार्यरत आहेत. तळकोकणात राणेंची आश्‍वासक साथ मिळाली तर दोन्ही जिल्ह्यातून सेनेला घायाळ करण्याची रणनीती सध्या भाजपमध्ये सुरू आहे. 

प्रसाद लाड यांच्यामागे पक्षाची ताकद

राज्यात युती झाली तर हा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला जाईल. त्यावेळी राणेंच्या स्वाभिमानचा झेंडा पुढे करून सेनेच्या वाटेत अडथळे आणण्याची तयारीही यानिमित्ताने करण्यात येत आहे. राणे आणि शिवसेनेत विळ्या भोपळ्याचे सख्य आहे. याचाच फायदा उठवण्यासाठी प्रसाद लाड यांच्या मागे पक्षाने लागेल ती ताकद उभी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com