रसायनी: रक्तदान शिबीराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लक्ष्मण डुबे
रविवार, 12 ऑगस्ट 2018

यावेळी श्री साई ब्लड बँक पनवेल यांनी रक्ताचे संकलन केले, तर 151 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. श्री साई ब्लड बँकेचे आणि पिल्लई कॉलेजचे कर्मचारी यांनी तसेच रोटरी क्लबच्या सदस्यांनी हे शिबीर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. 

रसायनी (रायगड) : रोटरी क्लब आँफ पाताळगंगा, महात्मा एज्युकेशन सोसायटीचे पिल्लई एचओसी एज्युकेशन कँप्स रसायनी आणि श्री साई ब्लड बँक यांच्या वतीने पिल्लेज काँलेजच्या सभागृहात शुक्रवारी रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबीराला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  

यावेळी उदघाटन प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाला रोटरी क्लब आँफ  पाताळगंगाचे अध्यक्ष सुनील कुरूप, सचिव ऋतुजा भोसले, सदस्य डॉ मिंलीद भगत, दिपक चौधरी, सुनिल भोसले, गणेश काळे, गणेश म्हात्रे, नागे़श कदम, डाँ धिरज जैन, संदीप साबळे, रेश्मा कुरूप, मेघा कोरडे, पिल्लई काँलेजेच्या एक्युझिटिव्हु सिईओ लता मेनन, तसेच श्री साई ब्लड बँकेचे सुनील पाटील आदि उपस्थित होते. 

यावेळी श्री साई ब्लड बँक पनवेल यांनी रक्ताचे संकलन केले, तर 151 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. श्री साई ब्लड बँकेचे आणि पिल्लई कॉलेजचे कर्मचारी यांनी तसेच रोटरी क्लबच्या सदस्यांनी हे शिबीर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. 

Web Title: blood donation camp in rasayani