चार हजार रुपयांची लाच स्विकारताना मंडल अधिकाऱी जाळ्यात

सुनील पाटकर
सोमवार, 26 मार्च 2018

महाड : वडिलांच्या नावावर असलेल्या जमिनीवर आईच्या नावाची वारस नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडून चार हजार रुपयांची लाच स्विकारताना महाड महसूल विभागांतर्गत काम करत असलेल्या मंडल अधिकार्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालयातच रंगेहाथ पकडले.

आज दुपारी दिड वाजता हि घटना घडली. शहाजी पांडूरंग भुजबळ (वय 41) असे या मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे. कांबळे तर्फे महाड येथील तक्रारदाराने अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. आपल्या आईच्या वडिलांच्या नावावर असलेल्या जमिनीवर आपल्या आईच्या नावाची वारस नोंद करण्यासाठी तक्रारदाराने मंडल अधिकारी शहाजी भुजबळ यांच्याकडे संपर्क साधला होता. 23 मार्चला भुजबळ याने हे काम करण्यासाठी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी केली.

अखेर या प्रकरणी चार हजार रुपयांत काम करून देण्याचे भुजबळ यांनी मान्य केले. दरम्यान या प्रकरणी तक्रारदाराने अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर या विभागाचे उपअधिक्षक विवेक जोशी आणि त्यांच्या पथकाने भुजबळ याच्या महाड येथील कार्यालयाबाहेर सापळा रचला. 26 मार्चला लाचेची ही रक्कम पंचा समक्ष स्विकारताना दुपारी दीड वाजता कार्यालयातच त्याला ताब्यात घेण्यात आले. शहाजी भुजबळ याच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. 

Web Title: The board officer was caught accepting a bribe of four thousand rupees