वाळीत टाकल्याची तक्रार केल्याने महिलेला धक्काबुक्की

सुनील पाटकर
मंगळवार, 15 मे 2018

महाड (रायगड) : वाळीत टाकल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केल्याचा राग मनात धरुन महिलेला मारहाण व तिचा विनयभंग केल्या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलीसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. महाड तालुक्यातील शेल देऊळकोंड येथे 13 मेला ही घटना घडली.

या प्रकरणी मिना गणेश आंब्रे यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गणेश आंब्रे यांच्या जागेत असलेल्या मंदिराचा जिर्णोध्दार करण्याबाबत गणेश आंब्रे यांनी नकार दिला होता. त्यानंतर 2014 पासून शेल देऊळकोंड येथील काही ग्रामस्थांनी त्यांच्यावर  सामाजिक बहिष्कार टाकला होता. या बाबत त्रस्त झालेल्या गणेश आंब्रे यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात मार्च 2018 ला तक्रार दाखल केली होती.याचा राग संतोष आंब्रे यांच्या मनात होता. मिना या बैलगाडीमधून त्यांचे शेतावर जात असताना चोघांनी यांची बैलगाडी थांबवून त्यांना खाली ओढले व त्यांचा विनयभंग केला. या प्रकरणा पोलिसांनी संतोष बबन आंब्रे, सुशांत संतोष आंब्रे, प्रशांत संतोष आंब्रे व संकेत संतोष आंब्रे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: boycotting a woman for register fir she suffered violance