आंबा नदीवरील पूल धोकादायक; कठडे तुटले

अमित गवळे
शुक्रवार, 6 जुलै 2018

पाली : पाली-वाकण मार्गावर असलेला अांबा नदीचा पूल धोकादायक झाला अाहे. पुलावर मोठे खड्डे पडले असून संरक्षक कठडे कमकुवत व तुटलेले अाहे. पुलावरुन क्षमतेपेक्षा तिप्पट वजनाची वाहतूक होत आहे. वाहतुकीच्या दृष्टीने हा पूल अत्यंत धोकादायक झाला आहे. यासंदर्भात 'सकाळ'मागील अडीच तीन वर्षांपासून लक्ष वेधत आहे.

पुलाचे लोखंडी संरक्षक कठडे (रेलिंग) कमकुवत झाले आहेत. काही ठिकाणी तुटले आहेत. तुटलेल्या ठिकाणी चक्क बांबू लावून तात्पुरती दुरुस्ती केली आहे. पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. फेब्रुवारी महिन्यात पुलाचे संरक्षक कठडे तोडून एक मोटार नदीत कोसळून एका महिलेला अापला जीव गमवावा लागला.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसअारडीसी) सध्या वाकण-पाली-खोपोली या मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरु अाहे. या मार्गावर पाली येथील पुलासह जांभूळपाडा व पेडली (भालगूल फाटा) हे महत्त्वाचे दोन पूल अाहेत. या पुलांवरुनदेखील क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होत असून हे पूल कमकुवत व धोकादायक झाले आहेत.

क्षमतेपेक्षा जास्त
मुंबई-गोवा महामार्ग व मुंबई पुणे द्रूतगती मार्गांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. केवळ एकोणीस टन वजन भार पेलण्याची क्षमता असलेल्या या पुलावरुन साठ टनाची वाहतूक होत आहे. त्यामुळे हा पूल दिवसेंदिवस कमकूवत होत आहे.

पुलाची तात्पुरती दुरुस्ती तसेच खड्डे भरण्याचे काम सुुरु करण्यास ठेकेदारास सांगण्यात आले आहे. या मार्गावरील पाली, जांभूळपाडा व पेडली (भालगूल फाटा) येथील पुलांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या रिजनल कार्यालयाने त्यांच्या वार्षिक अाराखड्यामध्ये हा विषय घेतला आहे. अंतिम मुंजूरी मिळाल्यास लगेच पुनर्रबांधणीचे काम सुरु करण्यात येईल.
- सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसअारडीसी

पुलाची खुप दुरवस्था झाली आहे. त्यामुळे मोठा अपघात झाल्यास अनर्थ होऊ शकतो. पुलाची लवकर दुरुस्ती करण्यात यावी.
- धनंजय चोरघे, व्यापारी, पाली

Web Title: Bridge on Amba river dangerous for transport