माजगावमधील पुलाचे काम रखडणार; आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

उपअभियंता अनिल आवटी यांनी चूक मान्य करताना हे मोजमाप शाखा अभियंत्यांनी साकव हेडखाली घेतले आहे; मात्र हे काम रद्द करून नव्याने ते मंजूर करण्यात येणार असल्याचे सांगितले. येथील पंचायत समितीची मासिक बैठक सभापती मानसी धुरी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन झाली. विविध विकास कामावर चर्चा झाली.

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग) - शाखा अभियंत्यांने माजगाव जाधववाडी येथील पाच मीटरचे पूल अडीच मीटर दाखवल्याने मंजूर काम रखडणार आहे. पावसाळ्यात हे पूल वाहून गेल्यास याला सर्वस्वी जबाबदार बांधकाम विभाग राहणार असून संबंधित विभागाच्या या कारभाराविरोधात ग्रामस्थांना घेऊन उपोषणाद्वारे कायदेशीर लढा दिला जाणार असल्याचा इशारा पंचायत समिती बैठकीत सदस्य श्रीकृष्ण ऊर्फ बाबू सावंत यांनी दिला. 

उपअभियंता अनिल आवटी यांनी चूक मान्य करताना हे मोजमाप शाखा अभियंत्यांनी साकव हेडखाली घेतले आहे; मात्र हे काम रद्द करून नव्याने ते मंजूर करण्यात येणार असल्याचे सांगितले. येथील पंचायत समितीची मासिक बैठक सभापती मानसी धुरी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन झाली. विविध विकास कामावर चर्चा झाली.

उपसभापती शितल राऊळ, सहाय्यक गटविकास अधिकारी वासुदेव नाईक आदी उपस्थित होते. झालेल्या चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेत आपापल्या भागातील विकासकामांचा आढावा घेतला. यामध्ये शेर्ले येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 च्या कोसळलेल्या छप्परावरुन उपसभापती शितल राऊळ यांनी बांधकाम व शिक्षण विभागाच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली. रुपेश राऊळ, रवींद्र मडगावकर, पंकज पेडणेकर, रेश्‍मा सावंत, प्राजक्ता केळुसकर, संदीप नेमळेकर, गौरी पावसकर, विष्णू चव्हाण आदींनी सहभाग घेत चर्चा केली. 

सदस्यांनी केलेल्या मागण्या 

  • मळगाव ब्राह्मणपाट जिल्हा परिषदेच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. ते खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत 
  • मळगाव रस्त्यावरील कुंभारवाडीमध्ये असलेला कॉजवे खचत असून ते काम तातडीने हाती द्यावे 
  • कारिवडे कालिका मंदिर रस्त्याचे काम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. याबाबत काय झाले ? 
  • तळवणे माऊली मंदिर संरक्षण भींतीचे काम अर्धवट राहिले आहे. ते लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी. 
  • सोनुर्ली तिठा ते दांडेली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. ते खड्डे बुजवण्याची मागणी. 
     

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bridge Work In Mazgaon Delayed A warning Of Agitation