‘ऑडिट’चे नाटक भोवले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

सावंतवाडी - माजगाव नाला येथील पुलाचे ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’ न करता आपला गाशा गुंडाळणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी रोखले. यावेळी काही कामगारांकडून तपासणी केल्याचे सांगितले तर काहींनी तपासणी झाली नाही, असे सांगितल्याने हे प्रकरण तापले. अखेर गाडीत भरलेली मशीनरी पुन्हा उतरवून जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत जाऊ देणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. 

सावंतवाडी - माजगाव नाला येथील पुलाचे ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’ न करता आपला गाशा गुंडाळणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी रोखले. यावेळी काही कामगारांकडून तपासणी केल्याचे सांगितले तर काहींनी तपासणी झाली नाही, असे सांगितल्याने हे प्रकरण तापले. अखेर गाडीत भरलेली मशीनरी पुन्हा उतरवून जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत जाऊ देणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या राज्यमार्गावरील पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट सुरू आहे. या तपासणीत संबंधित पूल धोकादायक आहेत का? तसेच त्यांची वयोमर्यादा किती आहे? किती काळ टिकू शकतो? निर्लेखनाची गरज आहे का? याबाबतची तपासणी जिल्हाभरात सुरू आहे. 
माजगाव नाला येथील पुलाची तपासणी करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी काम घेतलेल्या कंपनीकडून मशिनरी आणण्यात आली होती; मात्र कोणतेही काम केले नाही; परंतु आज सकाळी त्या ठिकाणी ठेवलेली मशिनरी गाडीत भरताना कामगार दिसून आले. हा प्रकार परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांनी पाहिला व पुलाची तपासणी न करता त्या ठिकाणावरुन सहित्य कसे का हलविले जात आहे, असा प्रश्‍न विचारल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या कामगारांनी पुलाची तपासणी पूर्ण झाली आहे, असे सांगितले.

काहींनी आपल्याकडे क्रेन नसल्यामुळे तपासणी होवू शकली नाही असे सांगितले. यामुळे दुसरीकडे काम करण्यासाठी आपण जात आहोत, असे त्यांनी सांगितले. 

त्यांच्या या उत्तरामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आणि नेमका प्रकार काय? हे शोधण्यासाठी त्यांनी कंपनीच्या सुपरवायझर आणि बांधकामच्या अधिकाऱ्यांना बोलाविण्यास सांगितले. त्या ठिकाणी बांधकामचे अधिकारी आले नाहीत; परंतु सुपरवायझरने आपल्याला अन्य ठिकाणी काम करायचे आहे यामुळे हे साहित्य अन्यत्र हलविण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी या पुलाची तपासणी होईपर्यंत मशीन नेण्यास देणार नाही अशी भूूमिका घेतली. तसेच गाड्यात भरलेली मशीन बाहेर काढण्यास सांगितली. 

यावेळी दिनेश सावंत, भाई निब्रे, हेलन निब्रे, तुकाराम सांवत आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

संबंधित ठेका घेतलेल्या कंपनीने यापूर्वी ज्या पुलाची तपासणी केल्याचा दावा केला आहे त्याचा अहवाल ‘बांधकाम’च्या अधिकाऱ्यांनी घ्यावा; अन्यथा भविष्यात खोट्या अहवालामुळे धोका निर्माण होऊ शकतो. 
त्यामुळे खबरदारी घेऊन योग्य ती भूमिका बांधकाम विभागाने घ्यावी.
- दिनेश सावंत

एनयूटी योजनेतून संबंधित रस्त्याची तपासणी सुरू आहे. या ठिकाणी नेमका काय प्रकार झाला हे मला माहिती नाही. याबाबत संबधित कंपनीच्या सुपरवायझरला बोलावून चौकशी करण्यात येईल.
- अमित वाघमारे, सहायक अभियंता, बांधकाम

Web Title: bridhe structural audit