आता बीएसएनएलचा डोलारा अवघ्या 'या' 62 जणांवर....

BSNL greater voluntary outburst in the district of ratnagiri koakn marathi news
BSNL greater voluntary outburst in the district of ratnagiri koakn marathi news

रत्नागिरी : भारत दूरसंचार निगम लि.(बीएसएनएल)ला जिल्ह्यात स्वेच्छानिवृत्तीचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यासाठी मंजूर 224 कर्मचाऱ्यांपैकी 162 जणांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन बाहेर पडले आहेत. अवघ्या 27 टक्के म्हणजे 62 जणांवर बीएसएनएलची जबाबदारी आहे. त्यापैकी भाट्ये येथील मुख्य कार्यालयाचा डोलारा तर अवघ्या 9 जणांवर आहे. 
बीएसएनएलच्या सेवेवर याचा परिणाम झाला आहे. मात्र, बीएसएनएल बंद पडणार नाही. "फोर जी' सेवा घेऊन पुन्हा उतरेल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. गेल्या काही वर्षांपासून बीएसएनएल मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. तोटा कमी करण्यासाठी बीएसएनएलने देशभरात कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली. वयाची 50 वर्षे पूर्ण केलेले सर्व नियमित व कायमस्वरूपी कर्मचारी या योजनेसाठी पात्र आहेत. स्वेच्छानिवृत्ती मिळविण्यासाठी 3 डिसेंबर 2019 अखेर कर्मचारी, अधिकाऱ्यांनी अर्ज केले होते. त्यानंतर केंद्र सरकारने निवृत्तीला मंजूरी दिली आहे. 


जिल्ह्यात बीएसएनएलचे 224 कर्मचारी सध्या वेगवेगळ्या पदावर कार्यरत होते. बीएसएनएल सुमारे 3 लाख प्रीपेड व पोस्टपेड मोबाइलधारकांना सेवा देते. लॅण्डलाईनची संख्या 24 हजार आहे. शहरापासून ग्रामीण भागापर्यंत बीएसएनएलचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. मात्र, बीएसएनएल आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे कर्मचाऱ्यांचे अनेक महिन्यापासून नियमित पगार रखडत होते. त्यातच बीएसएनएलने स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली.

त्या अंतर्गत मिळणारी भरपाईची रक्कम सेवा बजावलेल्या प्रत्येक वर्षासाठी 35 दिवसांचे वेतन आणि निवृत्ती बाकी असलेल्या प्रत्येक वर्षासाठी 25 दिवसांचे वेतन या सूत्राप्रमाणे दिली जाणार आहे. याशिवाय निवृत्ती घेणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना पेन्शनसुद्धा लागू होणार आहे. त्यामुळे या योजनेला जिल्ह्यात प्रतिसाद देत 224 पैकी 162 जणांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. 62 अधिकारी आणि कर्मचारी शिल्लक आहेत. त्यांच्यावर कामाचा मोठा ताण पडला आहे. 


 ठेकेदारी पद्धतीने लाईनमन 
जिल्ह्यात 24 हजार लॅण्डलाईन टेलिफोन आहेत. मात्र, या योजनेअंतर्गत अनेक लाईनमननी स्वेच्छा निवृत्ती घेतल्यामुळे केवळ 10 लाईनमन शिल्लक राहिलेत. त्यामुळे टेलिफोन दुरुस्तीच्या कामात अनेक अडथळे निर्माण होत आहेत. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे टेलिफोनच्या तक्रारींचे निवारण तत्काळ करता येत नाही तर ठेकेदारी पद्धतीने लाईनमन घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com