रत्नागिरीतील पाच तालुक्यात बीएसएनएल सेवा होणार ठप्प

BSNL Service Will Be Shut Down In Five Talukas Of Ratnagiri
BSNL Service Will Be Shut Down In Five Talukas Of Ratnagiri

गुहागर ( रत्नागिरी ) - महावितरणने तालुक्‍यातील शृंगारतळी आणि रानवी दूरध्वनी केंद्राची वीज सोमवारी सायंकाळी 6 वाजता तोडली. परिणामी गुहागर तालुक्‍यासह मंडणगड, खेड, दापोली, चिपळूण, मालगुंड या तालुक्‍यांमधील बीएसएनएलची मोबाईल, लॅण्डलाईन आणि ब्रॉडबॅंण्ड सेवा बंद होणार आहे. दूरध्वनी खात्यामध्ये मालगुंड स्वतंत्र तालुका मानण्यात येतो. तेथेही फटका बसणार आहे.

मंडणगड, खेड, दापोली, चिपळूण, जाकादेवी (मालगुंड) या तालुक्‍यासाठी शृंगारतळी हे महत्त्वाचे दूरध्वनी केंद्र आहे. शृंगारतळी केंद्रामध्ये ओएफसी केबलच्या माध्यमातून हे पाच तालुके रिव्हर्स सिग्नलसाठी जोडण्यात आले आहेत. या केंद्रातील वीज गेल्यानंतर पुढील चार तास बॅटरीवर ओएफसी मिडिया चालू राहू शकतो. त्यानंतर ओएफसी मीडियाची यंत्रणा बंद पडल्यावर या पाच तालुक्‍यांमधील संपर्क तुटणार आहे. त्याचप्रमाणे आबलोली, मासू, शीर, नरवण येथील मोबाईल आणि इंटरनेट यंत्रणाही बंद पडणार आहे. 

शृंगारतळी आणि रानवी दूरध्वनी केंद्राची तोडली वीज

थकित वीज बिल न भरल्याने तालुक्‍यातील गुहागर, शृंगारतळी आणि रानवी या केंद्रावर कारवाई करणार असल्याची सूचना महावितरणने दूरध्वनी खात्याला दिली होती. त्यावर उपविभागीय अभियंता दिगंबर नाटेकर यांनी या केंद्राची वीज तोडल्यास तालुक्‍यातील सेवा ठप्प होईल. देयक भरण्याची व्यवस्था करतो असे सांगितले होते. मात्र थकित बिल न भरल्याने सोमवारी (ता. 25) सायंकाळी 6 वाजता महावितरणने शृंगारतळी आणि रानवी दूरध्वनी केंद्राची वीज तोडली आहे. 

रानवी केंद्राचे कामही होणार ठप्प

रानवी दूरध्वनी केंद्रातून गुहागर केंद्राचे नियंत्रण केले जाते. ब्रॉडबॅण्ड आणि मोबाईल सेवांसाठी हे केंद्र महत्त्वाचे आहे. तेथे जनरेटरची व्यवस्था आहे. मात्र डिझेलचा साठा अपुरा असल्याने रात्री 8 नंतर रानवी दूरध्वनी केंद्राचे कामही ठप्प होणार आहे. त्यामुळे बॅंका, एस.टी. यासह शासकीय कार्यालयातील इंटरनेटवर चालणारे सर्व व्यवहारांवरही परिणाम होणार आहे. 

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील

रत्नागिरीच्या मुख्य कार्यालयातील लेखा विभागातर्फे थकित वीज देयकाचे पैसे भरण्याची विनंती वरिष्ठ कार्यालयाला करण्यात आली आहे. जिल्ह्याचे व्यवस्थापक श्रीकांत मब्रुखाने देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. मंगळवारी सायंकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. 
- दिगंबर नाटेकर, उपविभागीय अभियंता, गुहागर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com