गोवा अतिरेकीविरोधी कक्षाच्या ताफ्यात बुलेटप्रूफ जॅकेटस् व हेल्मेटस्

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

गोवा : गोवा पोलिस खात्यातील अतिरेकीविरोधी कक्षासाठी 50  बुलेटप्रूफ जॅकेटस् व 50 बुलेटप्रूफ हेल्मेटस् सरकारने खरेदी केली आहेत. हे कक्ष स्थापन झाल्यापासून गेल्या पाच वर्षांचीही मागणी अखेर पूर्ण झाली आहे. त्यामुळे या दलातील पोलिसांना आता अतिरेक्यांचा सामना करण्यास धाडस येणार आहे. बुलेटप्रूफ जॅकेटस् ही एनआयजी 3 प्लस या दर्जाची आहेत तर बुलेटप्रूफ हेल्मेटस् ही एनआयजी 3 ए दर्जाची आहेत.

या दोघांच्याही चाचण्या गांधीनगर - गुजरात येथील इन्स्टिट्यूट ऑफ फोरेन्सिक सायन्स बॅलेस्टीक सेंटर व टेस्टींग रेंज येथे करण्यात आल्या आहेत. बुलेटप्रूफ जॅकेटस् एस. एम. पी. पी. प्रा. लि. या दिल्लीतील पनीकडून तर बुलेटप्रूफ हेल्मेटस् कोलकाता फेब्रिकेटर्स या कोलकाता येथील कंपन्यांनी पुरवठा केला आहे. याशिवाय 10  बुलेटप्रूफ सेन्ट्री पोस्ट (मोर्चा), 30 बुलेटप्रूफ शिल्डस्, 2 बुलेटप्रूफ शस्त्रधारी वाहने लवकरच खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक व अतिरेकीविरोधी कक्षाचे प्रमुख कार्तिक कश्यप यांनी दिली.

Web Title: Bulletproof jackets and helmets in the anti-terrorism cell