वेंगुर्ले नवाबाग समुद्रात बंपर मासळी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

वेंगुर्ले - नवाबाग येथे रापण मच्छीमारांना आज सकाळी बंपर खडका (धोडकारे) मासळी मिळाली. यामुळे सकाळपासून नवाबाग किनाऱ्यावर मत्स्य खवय्यांनी मासे खरेदीसाठी गर्दी केली होती.

वेंगुर्ले - नवाबाग येथे रापण मच्छीमारांना आज सकाळी बंपर खडका (धोडकारे) मासळी मिळाली. यामुळे सकाळपासून नवाबाग किनाऱ्यावर मत्स्य खवय्यांनी मासे खरेदीसाठी गर्दी केली होती.

या मिळालेल्या मासळीत खडके सहित माणके, लहान इसवन, सुगंट अशी मासळी मिळाली. गणेश चतुर्थीनंतर ही बंपर मासळी मिळाल्याने आणि त्यात आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने नवाबाग किनाऱ्यावर मासे खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bumper Fish found in Vengurle Navabag sea