रत्नागिरीची सीए इन्स्टिट्यूटची नवी शाखा व्हावी सर्वोत्तम - एम. देवराजा रेड्डी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

रत्नागिरी - समाजात सीएची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे सीए अभ्यासक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. रत्नागिरीत सीए इन्स्टिट्यूटची शाखा सुरू होणे ही विशेष बाब आहे. आता येथील सीएची जबाबदारी वाढली असून रत्नागिरी बेस्ट ब्रॅंच बनवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे. तसेच विद्यार्थ्यांनी तीन वर्षांची आर्टिकलशिप अत्यंत प्रामाणिकपणे करावी, असे मत सीए इन्स्टिट्यूटचे राष्ट्रीय अध्यक्ष सीए एम. देवराजा रेड्डी यांनी व्यक्त केले.

रत्नागिरीमध्ये कोकणातील पहिल्या सीए इन्स्टिट्यूटच्या जिल्हा शाखेच्या प्रारंभानंतर ते बोलत होते. मारुती मंदिर येथील दामले विद्यालयानजीक मातृस्मृती बंगल्यामध्ये जिल्हा शाखा सुरू झाली आहे. या कार्यालयाचे उद्‌घाटन फित कापून उद्‌घाटन केले. त्यानंतर गोगटे-जोगळेकर महविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात कार्यक्रम झाला.

सीए रेड्डी यांनी आमदार उदय सामंत यांच्याकडे शाखेची स्वमालकीची इमारत होण्यास योग्य अशी जागा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. त्याला त्वरित प्रतिसाद देऊन आमदार उदय सामंत यांनी नगराध्यक्ष राहुल पंडित यांना सांगून लागेल ते सर्व सहकार्य करण्याचे मान्य केले.

आमदार सामंत यांनी बहुसंख्य लोकांवर परिणाम करणाऱ्या नोटाबंदीसारख्या विविध विषयांवर मार्गदर्शनासाठी लोकप्रतिनिधी व सीए यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. त्याला रत्नागिरी शाखाध्यक्ष सीए भूषण मुळ्ये यांनी प्रतिसाद दिला व भविष्यात असे नक्की घडेल, अशी ग्वाही दिली.

या वेळी उपाध्यक्ष नीलेश विकमसे, नगराध्यक्ष राहुल पंडित, शिवाजी झावरे, प्रफुल्ल छाजेड, मंगेश किनरे, श्रुती शाह, रत्नागिरी शाखाध्यक्ष सीए भूषण मुळ्ये, उपाध्यक्ष श्रीरंग वैद्य, सचिव अँथोनी राजशेखर, कोषाध्यक्ष अभिजित चव्हाण, कार्यकारिणी सदस्य बिपिन शाह, सुमेध करमकर, जिल्ह्याभरातून आलेले सीए व विद्यार्थी आदी उपस्थित होते.

Web Title: ca institute new branch