नवोदित सीएंचा इन्स्टिट्यूटतर्फे सत्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

रत्नागिरी - सीए इन्स्टिट्यूटची रत्नागिरी शाखा गेल्या वर्षी सुरू झाली. यंदा प्रथमच सर्व परीक्षांसाठी रत्नागिरीत केंद्र सुरू झाले. यामुळे कोल्हापूर, पुणे, मुंबईत जाण्याचा सर्वच विद्यार्थ्यांचा त्रास वाचला. याचा फायदा नव्याने सीए झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मिळाला.

रत्नागिरी - सीए इन्स्टिट्यूटची रत्नागिरी शाखा गेल्या वर्षी सुरू झाली. यंदा प्रथमच सर्व परीक्षांसाठी रत्नागिरीत केंद्र सुरू झाले. यामुळे कोल्हापूर, पुणे, मुंबईत जाण्याचा सर्वच विद्यार्थ्यांचा त्रास वाचला. याचा फायदा नव्याने सीए झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मिळाला. रत्नागिरीतून यावर्षी 9 विद्यार्थी सीए उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांचा सत्कार सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे करण्यात आला.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमास रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, सीए इन्स्टिट्यूट शाखाध्यक्ष श्रीरंग वैद्य, उपाध्यक्ष अँथोनी राजशेखर, कला निंबरे, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आदी उपस्थित होते. या वेळी नूतन सीए यशश्री चौधरी, सीए आयेशा अघाडी, सीए संकेत पाटणकर यांचा सत्कार करण्यात आला. सीए अनुप शहा याच्या वतीने वडिल सीए बिपीन शहा यांनी सत्कार स्वीकारला. कुणाल पटेल, रवींद्र पाभरणकर, शीतल सुराणा, अमेय वझे, पवन लांडगे हेसुद्धा नूतन सीए झाले असून काही कारणामुळे येऊ शकले नाहीत.

 

Web Title: CA institute in ratnagiri