घशाला झाल्या जखमा पाणी पिणेही झाले होते अशक्‍य डाॅक्टरांच्या  प्रयत्नांनी 30 वर्षाच्या तरूणाला मिळाले जीवनदान 

cancer patient received a life donation Treatment of youth in Chiplun health marathi news
cancer patient received a life donation Treatment of youth in Chiplun health marathi news

चिपळूण (रत्नागिरी) :  रक्ताचे कर्करोग योग्य वेळी योग्य उपचार घेतल्यास बरे होऊ शकतात. केमोथेरपीच्या दुष्परिणामांचे निदान झाल्यास ते देखील आटोक्‍यात आणता येतात. रुग्णांनी वेळीच डॉक्‍टरांचा सल्ला घेतला आणि त्यानुसार औषधोपचार केले तर रूग्ण लवकर बरा होऊ शकतो. चिपळुणातील 30 वर्षाच्या कर्करुग्णाचे बाबतीत याचा पडताळा आला. येथील डॉ. पाटील यांनी या रुग्णाला जणू जीवनदान दिले. 

येथील 30 वर्षाच्या युवकाला टी सेल लिम्फोब्लास्टीक कॅन्सरचे निदान झाले. डॉ. विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथील ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटर व नंतर साता-यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर येथे दाखल करण्यात आले. रुग्णाच्या पहिल्या दोन केमोथेरेपी यशस्वीपणे पार पडल्या. मात्र, तिस-या केमोथेरेपीनंतर रुग्णाच्या अंगावर लाल रंगाचे चट्टे येऊन त्यात जखम चिघळू लागली. काही दिवसांमध्ये संपूर्ण शरीरावरच असे चट्टे उमटलेले पाहायला मिळाले. 

रुग्णाच्या घशालाही जखमा झाल्या. त्याला पाणी पिणेही अशक्‍य होऊ लागले. रुग्णाला सतत ताप येण्यास सुरुवात झाली व हा संसर्ग रक्तात पसरु लागला. या कारणांमुळे रुग्णाच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होऊन त्याला अतिदक्षता विभागात दाखल केले. याकरिता प्रोत्साहन दिल्याबद्दल या जोखमीच्या उपचारास डॉ. विनोद पाटील यांना डॉ. गौरव जसवाल, किरण जगताप, कबीर मुलाणी, तेजस भोसले, उत्तरा पाटील, भगवान उगले, रेवती पवार, सहायक डॉक्‍टर व नर्सेस यांची मोलाची साथ लाभली. 

रक्तातील संर्सग कमी होऊ लागला 
रूग्णाच्या शरीरातील पेशींची संख्या वाढून रक्तातील संर्सग देखील हळूहळू कमी होऊ लागला. त्यानंतर करण्यात आलेल्या चाचणीतून रुग्णाच्या गुणसुत्रात दोष असल्याचे आढळून आले. याच कारणामुळे केमोथेरेपीचे गंभीर दुष्परिणाम आढळून आले. आता रुग्णाची चौथी केमोथेरेपी पूर्ण होत असून तो बरा होत आहे. 

उच्च प्रतीची प्रतिजैविक 
दरम्यान, रुग्णाला अन्न आणि पाण्याचे सेवन करणे देखील मुश्‍कील होऊ लागले. त्याला सलाईनमधून पोषक घटक पुरविण्यात येऊ लागले. रुग्णाचा रक्तदाब देखील खालावू लागला. त्यानुसार औषधोपचार सुरु करून रक्तदाब सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. रुग्णाला उच्च प्रतीची प्रतिजैविक सुरु करण्यात आली. वीस दिवसांच्या प्रयत्नानंतर अखेर रुग्णाची प्रकृती सुधारु लागली.  

संपादन- अर्चना बनगे

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com