युतीवर उमेदवार आयात करण्‍याची वेळ

अमोल टेंबकर
मंगळवार, 24 जानेवारी 2017

सावंतवाडी - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस पक्षातच उमेदवारांची श्रीमंती दिसत आहे. शिवसेना आणि भाजपला उमेदवार आयात करण्याची वेळ आली आहे. एकूण या सर्व परिस्थितीत ताकद असली तरी शिवसेनेला मात्र उमेदवार शोधण्याची वेळ आल्याचे चित्र आहे. ही वस्तुस्थिती अखेरपर्यंत राहिली तर काँग्रेसला जिल्हा परिषद, पंचायत समितीत फायदा होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सत्ता राखण्याचा आणि स्थापन्याचा दावा करीत असलेले शिवसेना, भाजपचे नेते तालुक्‍यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या नऊ जागा ताब्यात घेण्यासाठी कोणती रणनीती आखतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे. 

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे.

प्राथमिक अवस्थेत जो तो स्वबळावर लढण्याची भाषा करीत असताना पालिका निवडणुकीत आलेले अपयश लक्षात घेता आता काही झाले तरी युती करूनच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला सामोरे जाण्यात यावे, असे दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर झालेल्या युतीच्या चर्चेत निघालेली माहिती भयावह आहे. तालुक्‍यात या ठिकाणी शिवसेना, भाजपकडून युती करण्याचे संकेत दिले. परंतु, दोन्ही पक्षांकडे म्हणावे तसे सक्षम उमेदवार नाहीत, अशी माहिती एका भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जिल्ह्यात आणि पर्यायाने सावंतवाडी तालुक्‍यात बांदा जिल्हा परिषद मतदारसंघ सोडल्यास भाजपची ताकद नव्हती. तर कोलगाव येथे आता पंचायत समिती उपसभापती महेश सारंग हे येत असल्यामुळे त्या ठिकाणी आमची ताकद वाढणार आहे. परंतु, अन्यत्र ठिकाणी भाजप सद्यःस्थितीत तरी नवखे अथवा अन्य पक्षांतून आयात करणारे चेहरे देऊन निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेची परिस्थिती तर त्यापेक्षा नाजूक दिसत आहे.

पालकमंत्री, खासदार, आमदार असले तरी गेल्या काही वर्षांत पक्षांच्या नेत्यांकडून संघटना वाढीसाठी आणि कार्यकर्ते वाढविण्यासाठी म्हणावा तसा प्रयत्न न झाल्यामुळे शिवसेनेला नवे चेहरे शोधावे लागणार आहेत. 

नाराजांचा शोध...
सद्यःस्थिती लक्षात घेता कोलगाव मतदारसंघात मायकल डिसोझा, मळेवाड मतदारसंघात राजू नाईक, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, चंद्रकांत कासार आदींची नावे आघाडीवर आहेत. तर अन्य ठिकाणी उमेदवार शोधण्याची वेळ पक्षाकडे आली आहे. त्यामुळे उमेदवार शोधण्यापेक्षा नवख्या उमेदवारांना संधी द्यावी किंवा अन्य पक्षांतील नाराज चेहऱ्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या सर्व परिस्थितीत काँग्रेसकडे मात्र इच्छुक चेहरे भरपूर आहेत. यात रेश्‍मा सावंत, पंकज पेडणेकर, उत्तम पांढरे, उन्नती धुरी, सुषमा गावडे, हेमंत मराठे, प्रमोद सावंत, वासुदेव परब आदी प्रस्थापित नावांचा समावेश आहे. एकंदरीत या सर्व परिस्थितीत या उमेदवारांचा फायदा घेऊन पुन्हा एकदा जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसची मंडळी पुढे सरसावली आहे.

Web Title: candidate import by shivsena-bjp alliance