वाकण पाली मार्गावर जंगली पिरनजीक कारचा अपघात

अमित गवळे
शुक्रवार, 4 मे 2018

या अपघातात कार रस्ता सोडून अनेक फुट दूर गेली होती. अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांसह पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मदतकार्य केले. याबाबत सविस्तर माहिती अशी, की सुनिल हजारे (रा.पेण) वाकण पालीमार्गे पत्नी नूतन व मुलगी शितल हजारे यांच्यासह पालीतील नातेवाईकांकडे लग्नाला जात होते. 

पाली : वाकण पाली मार्गावर शुक्रवारी (ता.4) दुपारी अडीचच्या सुमारास एका कारचा अपघात झाला. वजरोली गाव फाटा व जंगली पिरनजीक असलेल्या एका झाडावर ही कार अादळली. या अपघातात पालीला लग्नासाठी जाणारे एकाच कुटुंबातील अाई वडील व मुलगा असे तिघेजण जखमी झाले.

या अपघातात कार रस्ता सोडून अनेक फुट दूर गेली होती. अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांसह पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मदतकार्य केले. याबाबत सविस्तर माहिती अशी, की सुनिल हजारे (रा.पेण) वाकण पालीमार्गे पत्नी नूतन व मुलगी शितल हजारे यांच्यासह पालीतील नातेवाईकांकडे लग्नाला जात होते. 

यावेळी कारचा रिव्हर्स गिअर पडल्याने कार वेगाने मागच्या बाजूला येऊन झाडावर अादळून रस्त्याच्या बाहेर गेली. यामध्ये कारमधील तिघेजन जखमी झाले असून जखमींना उपचारांसाठी तातडीने नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

Web Title: Car Accident Near Jungli Piran Vakan Pali Road