आंबेनळी घाटात कारला अपघात, चालक बचावला

नील पाटकर
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

महाड : पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात दांभिळ गावच्या हद्दीत बीएमडब्ल्यू कार चाळीस फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात कार चालवणार तरुण जखमी झाला आहे. आज 20 ऑक्टोबरला सकाळी 10.30 वाजण्याच्या  सुमारास हा अपघात झाला. यामुळे आंबेनळी घाटातील प्रवास आता जिकरीचा झाला आहे.

महाड : पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात दांभिळ गावच्या हद्दीत बीएमडब्ल्यू कार चाळीस फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात कार चालवणार तरुण जखमी झाला आहे. आज 20 ऑक्टोबरला सकाळी 10.30 वाजण्याच्या  सुमारास हा अपघात झाला. यामुळे आंबेनळी घाटातील प्रवास आता जिकरीचा झाला आहे.

भोसरी येथील प्रशांत राजेंद्र सस्ते (वय 27) हा तरुण शनिवारी सकाळी आपल्या बीएमडब्ल्यू कारने पोलादपूरहून महाबळेश्वरकडे जात होता. पोलादपूर हद्दीत आंबेनळी घाटातील दांभिळ गावच्या हद्दीत त्याचा कारवरील ताबा सुटला. यानंतर कार सुमारे चाळीस फूट खोल दरीत कोसळली. अपघातवेळी प्रशांत सस्ते कारमधून बाहेर फेकला गेला. कारसह दरीतील एका झाडाला अडकून राहिला. याच दरम्यान पाठीमागून येणाऱ्या एका कार चालकाने तातडीने प्रतापगड व वाडा कुंभरोशी येथील नागरिकांना माहिती देताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रशांतला बाहेर काढला.

बेशुद्धावस्थेतच त्याला उपचारासाठी पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलादपूर पोलीस व महाबळेश्वर येथील टेकर्स संजय पार्टे व त्याच्या टीम ने तातडीने घटनास्थळी आले व कार बाहेर काढण्याचे काम सुरु केले. याघटनेनंतर महाबळेश्वर येथे प्रशांत सोबत फिरायला आलेल्या किरण गायकवाड, दत्तात्रय बारणेव अजिंक्य साठे या मित्रांना अपघाताची माहिती समजताच त्यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व महाबळेश्वर येथे एका हॉटेलला थांबले होते. प्रशांत सकाळी 9 वाजता फिरून येतो असे सांगून गेला होता. त्याच फोन संपर्क होत नसल्याने हे त्याचा शोध घेत होते. 28 जुलैला याच घाटात दापोली कृषि विद्यापिठाच्या बसला अपघात होऊन तीस जण जागीच मरण पावले होते. त्यानंतर हा घाट व त्यातील सुरक्षितता हा प्रश्न ऐरणीवर आला होता. बस अपघाता प्रमाणेच हा अपघात झाला ते ठिकाणही अपघात प्रवण क्षेत्र नव्हते. बांधकाम विभागाने या घाटात बहुतांश ठिकाणी आता संरक्षक कठडे बसवले आहेत.

आंबेनळी घाट हा आडवा घाट असल्याने, घाटातील रस्ता सुस्थितीत व रुंद असल्याने वाहन चालक वेग मर्यादा पाळत नाहीत. या घाटात दाभीळ टोक, दाभीळ कॅार्नर, बाहूली टोक, रेडका धबधबा, चिरेखिंडीतील अरुंद कॉर्नर अशी धोकादायक ठिकाणे आहेत. अनेक धोकादायक वळणाच्या ठिकाणी रस्ता, तसेच धबधब्या ठिकाणी मोरी रुंदीकरण करण्यात आलेले आहेत. धोकादायक ठिकाणी रेलिंगही आहेत. चालकाची सावधानताच केवळ घाटातील अपघात रोखु शकते. 
 

Web Title: Car accidents and drivers escaped in the ambulance