सलग दुसऱ्या दिवशी घडला प्रकार ; रत्नागिरीत या वकिलाने केली आत्महत्या...

सकाळ वृत्तसेवा | Tuesday, 7 July 2020

सलग दुसऱ्या आत्महत्येने रत्नागिरीत एकच चर्चा सुरू  आहे. 

रत्नागिरी : शहरातील एका वकिलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सलग दुसऱ्या आत्महत्येने रत्नागिरीत एकच चर्चा सुरू       आहे. कालच एका बँक अधिकाऱ्याने आत्महत्या केल्यानंतर आज  एका वकिलाने गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. 

हेही वाचा- मुंबई- कांदिवलीतून आल्या मायलेकी, अन् अख्खे गाव तत्काळ लाॅकडाउन
 

अमेय अजित सावंत (34) असे आत्महत्या केलेल्या वकिलाचे नाव आहे. आज मध्यरात्री त्यांनी परटवणे येथील राहत्या घरी बेडरूममधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. मध्यरात्री उशिरा ही बाब लक्षात आल्यानंतर शहर पोलिसांना याची खबर देण्यात आली.  

हेही वाचा- कोरोनाच्या संकटात वित्त आयोगाची सिंधुदुर्गवर काय झालीय कृपादृष्टी? वाचा

अमेय सावंत हे बार असोसिएशनचे सदस्य होते. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच अनेक वकिलांनी त्यांच्या घरी धाव घेतली. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार त्यांच्या गावी मिऱ्या येथे होणार आहेत.