रोह्यावर सीसी टीव्हीचा वॉच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

सीसी टीव्हीमुळे वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण राहणार आहे, महत्त्वाच्या ठिकाणी हे कॅमेरे बसविले जाणार आहेत...
रोहा - रोहा शहरामध्ये आता १४ ठिकाणी नाईट व्हिजन सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच असणार आहे. ‘स्मार्ट सिटी’ योजनेंतर्गत रोहा नगरपालिकेला राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीतून यासाठी खर्च केला जाणार आहे. या कॅमेऱ्यांमुळे शहरातील गुन्हेगारीला आळा बसणार आहे.

शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या धावीर देवस्थानाचे प्रवेशद्वार, नगरपालिका चौक, रोहा प्राईड हॉटेल चौक, कुंडलिका नदीवरील पूल, हनुमान टेकडीकडे जाणारा रस्ता, मोरे आळी येथील धावीर चौक, दमखाडी नाका परिसर, फिरोज टॉकिज परिसर, तीनबत्ती नाका, अष्टमी, मेहेंदळे हायस्कूल परिसर या ठिकाणी हे कॅमेरे बसवले जाणार आहेत. यामुळे पोलिसांना पोलिस ठाण्यामधील नियंत्रण कक्षात बसून नियंत्रण ठेवता येणार आहे. माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांच्या कार्यकाळात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांच्या हस्ते याचे उद्‌घाटन झाले होते. शहरांत सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरू केलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले.

रोहा शहरात सीसी टीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यात सहकार्य होणार आहे. एखादा गुन्हा घडल्यास त्याचा शोध लावण्यास पोलिसांना गती मिळेल. यासाठी नगरपालिकेने घेतलेला पुढाकार नक्कीच प्रशंसनीय आहे.
- निशा जाधव, पोलिस निरीक्षक, रोहा.

गुन्हेगारीवर नियंत्रण
धूम स्टाईल बाईकस्वार, रोडरोमियो, सोनसाखळी चोर, भुरट्या चोऱ्या करणारे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारे यांच्यावर सीसी टीव्ही कॅमेऱ्यांमुळे नजर ठेवता येणार आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ रेकॉर्डिंग सेव्ह राहणार आहे. त्यामुळे गुन्हेगार शोधण्यासाठी पोलिसांना मदत होणार आहे.

Web Title: cctv watch on roha