रत्नागिरी : नववर्षाचे स्वागत साधेपणाने करा; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

गर्दी टाळूया; कोरोनाला हरवू या
New year Celebration
New year Celebrationsakal
Summary

रत्नागिरी : कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये “ओमिक्रॉन” ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आली आहे. त्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये, रहिवाशांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याच्यादृष्टीने खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणात एकत्र न येता ३१ डिसेंबर २०२१ (वर्ष अखेर) व नूतन वर्षाचे स्वागत साधेपणाने करून कोरोनाला हरवू या, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.(celebrate new year simply appeal of ratnagiri district administration for the people omicron varient)

New year Celebration
भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीला दिले 'हे' आव्हान; पाहा व्हिडिओ

याबाबत प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता शक्यतोवर घरीच साधेपणाने करावे. पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. नूतन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या ५० टक्केपर्यंत तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या २५ टक्केच्या मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सामाजिक अंतर राखले जाईल तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

New year Celebration
अखेर राणेंनी सिंधुदुर्गचं मैदान मारलंच; शिवसेनेचा सुपडा साफ

नूतन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या ५० टक्केपर्यंत तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या २५ टक्केच्या मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी आहे.

या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सामाजिक अंतर राखले जाईल तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com