सावंतवाडी तालुक्‍यात रस्ते अडविले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

‘ही तर केवळ झलक’चा नारा - मळगावात चक्का जाम; सरकारला दिला इशारा

सावंतवाडी - सकल मराठा समाजाने आज केलेले आंदोलन ही केवळ एक झलक आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्यांबाबत देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने लवकरात लवकर सकारात्मक पावले उचलावीत, अन्यथा भावी काळात राज्यातील एकाही रस्त्यावरून एकही वाहन वाहतूक करू शकणार नाही, अशी व्यूहरचना सकल मराठा समाज करेल, अन्‌ ते करण्याची क्षमता मराठा समाजात नक्कीच आहे, असा इशारा येथील सकल मराठा समाज तालुका समन्वयक विक्रांत सावंत यांनी दिला.

झाराप-पत्रादेवी मार्गावर मळगाव येथे ‘जय भवानी, जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा, हर हर महादेव, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, अशा गगनभेदी घोषणा देत चक्का जाम आंदोलन करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तालुका समन्वयक सावंत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेसचे नेते विकास सावंत, सभापती प्रमोद सावंत, माजी नगरसेवक सुदन्वा आरेकर यांच्यासह गुरू गावकर, दादा नाईक, आबा सावंत, सुधीर राऊळ, गुणाजी गावडे, विष्णू गावडे, विजय सावंत, राजू सावंत, बाबू सावंत, बाळा कुडतरकर, श्रीपाद सावंत, गोट्या सावंत, दाजी सावंत, मिलिंद देसाई, अभिमन्यू गावडे, प्रशांत कोठावळे, अजय सावंत, सूरज राऊळ, सच्चिदानंद आंगचेकर, युवराज मांजरेकर, सूर्यकांत पालव, लक्ष्मण आश्‍वेकर, हरिश्‍चंद्र राऊळ, सुनील राऊळ, विनायक राऊळ, वसंत तावडे, प्रकाश राऊळ, लक्ष्मण राऊळ, अभय किनळोसकर, शशिकांत राऊळ, नंदकिशोर देवळी, संदेश मुळीक, नीलेश शेटकर, नंदकिशोर गावडे, संदेश गावडे, नारायण आकेरकर आदी समाज बांधवांनी सक्रिय सहभाग घेत हे आंदोलन यशस्वी केले.

अखिल महाराष्ट्र समन्वय समितीच्यावतीने मुंबई येथील बैठकीत ३१ ला चक्का जाम, तर ६ मार्चला मुंबईत मूक महामोर्चा घेण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात कुडाळ येथे घेण्यात आलेल्या बैठकीत महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा वापर करत हे आंदोलन पार पाडण्याचा निर्धार करण्यात आला होता. त्यानुसार आज पहाटेपासूनच रस्ता बंद करण्याच्या दृष्टीने निरवडे, कोलगाव-सावंतवाडी मार्ग, कोलगाव-बुर्डी पूल मार्ग, तसेच झाराप-पत्रादेवी मार्गावर वेत्ये व नेमळे या ठिकाणी टायर जाळून रस्ता रोखण्यात आला. त्यामुळे सकाळी महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा काही प्रमाणात फटका बसल्याची माहिती पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली.
 
पोलिस ठाण्यात वकिलांची फौज 
चक्का जाम करणाऱ्या मराठा समाज बांधवांना पोलिसांनी ताब्यात घेताच मराठा वकिलांची फौज पोलिस ठाण्यात दाखल झाली. ॲड. नीता सावंत, शामराव सावंत, डी. के. गावकर, जायबा धुरी, सचिन सावंत आदींनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मराठा समाज बांधवांची सुटका करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Web Title: chakka jam agitation maratha kranti morcha