esakal | चाकरमान्यांच्या दिमतीला एसटी, कितीजण आले सिंधुदुर्गात?
sakal

बोलून बातमी शोधा

chakrmani come in ST buses to Sindhudurg

आज नव्याने 5 हजार 314 व्यक्ति आल्या असून 1 ऑगस्टपासून जिल्ह्यात दाखल होणाऱ्यांची संख्या 22 हजार 648 झाली आहे. 

चाकरमान्यांच्या दिमतीला एसटी, कितीजण आले सिंधुदुर्गात?

sakal_logo
By
विनोद दळवी

ओरोस (सिंधुदुर्ग) - राज्य परिवहन मंडळाच्या एसटीने जिल्ह्यात आता चाकरमानी दाखल होऊ लागले आहेत. आज जिल्ह्यात 6 बसेस दाखल झाल्या. आज नव्याने 5 हजार 314 व्यक्ति आल्या असून 1 ऑगस्टपासून जिल्ह्यात दाखल होणाऱ्यांची संख्या 22 हजार 648 झाली आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 मे ते 31 जुलै पर्यंत दाखल झालेल्या नागरिकांची संख्या 1 लाख 60 हजार 432 होती. त्यात 1 ऑगस्टला 2 हजार 811 व्यक्ती वाढल्याने ही संख्या 1 लाख 63 हजार 243 झाली. 2 ला 3 हजार 913 नागरिक दाखल झाले आहेत. 3 ला 2 हजार 975 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर आज आणखी 2 हजार 563 व्यक्ती दाखल झाल्याने ही आकडेवारी 9 हजार 451 झाली होती.

5 रोजी यात 3 हजार 417 ने वाढ होत 12 हजार 868 संख्या झाली होती. 6 ला आणखी 4 हजार 466 व्यक्ती दाखल झाल्याने ही संख्या 17 हजार 334 झाली होती. आज 5 हजार 314 व्यक्ति वाढल्याने ही संख्या 22 हजार 648 झाली आहे. 
शासनाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु केलेली नाही.

आतापर्यंत जिल्ह्यात दाखल होणारे नागरिक खाजगी वाहनाने येत होते. राज्याने गणेशोत्सव पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दाखल होणाऱ्या नागरिकांसाठी एसटीची सुविधा मुंबई येथून केली आहे. त्यामुळे चाकरमानी यांच्यासाठी सुविधा उपलब्ध झाली आहे. याचा फायदा घेत शुक्रवारी जिल्ह्यात 6 एसटी मधून चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यासाठी ई पास काढावा लागत नसल्याने मनस्ताप वाचतो. परिणामी चाकरमानी एसटी प्रवासाकडे वळताना दिसत आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात येण्यासाठी किंवा जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी एसटी सुविधा उपलब्ध असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले. 

क्वारंटाईनबाबत संभ्रमच 
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी 10 दिवसांचे क्वारंटाईन करण्यात आल्याचे चार दिवसांपूर्वी जाहीर केले आहे. मात्र, जिल्ह्यात अजून 14 दिवसांचे क्वारंटाईन सक्तीचे आहे. त्यामुळे येणाऱ्या चाकरमान्यांत संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना विचारले असता मंत्री महोदयांनी 10 दिवस क्वारंटाईनचा निर्णय जाहीर केला आहे; पण त्याबाबत आम्हाला लेखी आदेश नाही. आम्ही लेखी आदेश मागितले असल्याचे सांगितले.  

संपादन - राहुल पाटील

loading image
go to top