वृद्धाचे स्मशानातील जगणे सुखकर करण्यासाठी त्यांची धडपड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

माणगाव - पंधरा वर्षांहून अधिक काळ स्मशानभूमीत वास्तव्य करणाऱ्या चंद्रकांत नारायण लाड (वय ७६) या वृद्धाला येथील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दत्तक घेतले.

येथील माणगाव कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे निवासी श्रमसंस्कार शिबिर घावनळे येथे नुकतेच झाले. या परिसरात चंद्रकांत लाड गेली पंधरा वर्षे स्मशानात राहतात, हे विद्यार्थ्यांना समजल्यावर त्यांनी त्यांची भेट घेतली. सुशिक्षित आणि सुसंस्कृत असून गेली पंधरा वर्षे स्मशानात राहून अंधश्रद्धेला हद्दपार करणाऱ्या या ७६ वर्षीय वृद्धाची पुढील जीवनाची जबाबदारी सर्व विद्यार्थ्यांनी घेण्याचे मनोगत प्राध्यापकांसमोर व्यक्त केले.

प्रा. उदय राऊळ यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी सेवा संघटना स्थापन करून या संघटनेचे पहिले काम म्हणून श्री. लाड यांना दत्तक घेण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी घावनळे-खुटवळवाडी येथील स्मशानभूमीचा परिसर स्वच्छ केला आणि ज्या स्मशानभूमीच्या शेडमध्ये लाड यांनी वास्तव्य केले त्या शेडची डागडुजी केली. लाड यांना सर्व प्रकारची औषधे व जीवनावश्‍यक वस्तू दिल्या. महिन्यातून दोन वेळा या ठिकाणी भेट देण्याचे ठरले. पूर्ण एक दिवस कॉलेजच्या चाळीस विद्यार्थ्यांनी प्रा. उदय राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा वर्षांहून अधिक काळ स्मशानात राहणाऱ्या लाड यांच्याबरोबर घालवला. तो एक दिवस लाड यांच्यासाठी मन हेलावून टाकणारा होता. चाळीस विद्यार्थ्यांच्या सहवासातील तो दिवस आपणास पुढील आयुष्यात स्फूर्ती देणारा असाच आठवणीत राहील, अशी प्रतिक्रिया लाड यांनी दिली. कॉलेज जीवनात केवळ मौजमजाच नाही तर सेवाभावी वृत्तीने अनाथांना आधार देण्यासाठी सेवा संघटना स्थापन करून ते कार्य चालू करणारेही कॉलेज युवक-युवती आहेत, हेच जणू माणगाव कॉलेजने दाखवून दिले. त्यांच्या या कृतीचे कौतुक होत आहे.

Web Title: chandrakant lad adopt by student

टॅग्स