...त्यामुळे आता विनापास रत्नगिरीत प्रवेश करता येणार नाही

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 August 2020

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याची स्थानिकांकडून सातत्याने तक्रार केली जात होती. अ

साडवली - संगमेश्‍वर तालुक्‍यातील रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर मुर्शी येथे चेकनाका असल्यामुळे अनेकजण कळकदरा या जोड रस्त्याचा वापर करून रत्नागिरीत विनापास शिरकाव करत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याची स्थानिकांकडून सातत्याने तक्रार केली जात होती. अखेर 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी खडी ओझरे खुर्द येथे चेकनाक्‍याचा प्रारंभ झाला. 

चेकनाक्‍याबाबत पुढील आदेश येईपर्यंत तो सुरू राहणार आहे. या आडमार्गावर मार्लेश्‍वर तीर्थक्षेत्र, देवरूख, रत्नागिरी, चिपळूणकडे जाण्यासाठी नेहमी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. सध्या कोरोनाचे थैमान असल्याने सर्वत्र समूह संसर्ग रोखण्यासाठी चेकनाका सुरू केला आहे. हा चेकनाका कायमस्वरूपी ठेवण्यात आला तर गुन्हेगारीला, चोरट्या गुरांच्या वाहतुकीला, वाड्यातील गुरांच्या होणाऱ्या चोरीला आळा बसून गुन्हेगारांना चाप बसण्यास मदत होणार आहे. यासाठी आमदार शेखर निकम आणि आमदार राजन साळवी यांनीही जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन दिले होते, तर स्थानिक पंचायत समिती सदस्य जया माने यांनीही मागणी लावून धरली होती.

हे पण वाचा - हृदयद्रावक , संपूर्ण कुटुंब उद्धवस्त :  लहान भावाच्या मृत्युच्या धक्क्याने मोठ्या भावाचाही मृत्यू 

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ग्रामस्थांची मागणी अखेर पूर्ण झाली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार पाचपुते यांच्या देखरेखीखाली, पोलिस हेड कॉन्स्टेबल संदेश जाधव, पोलिस कॉन्स्टेबल किरण देसाई, प्रदीप पाटील, पोलिस नाईक कदम, होमगार्ड संदेश जाधव, तेजस जाधव, ग्रामसेवक नजीरोदिन मोहम्मद, पोलिसपाटील साक्षी जाधव, ओझरेच्या सरपंच गीता हातीम, उपसरपंच पांडुरंग कदम, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबाजी जाधव, गावातील गावकर मानकरी व ग्रामस्थ यांनी काही अवधीत तपासणी नाका सुरू करण्यास मोलाचे सहकार्य केले आहे. 
 

संपादन- धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: check post start in ratnagiri Khadi ozare khurd