बर्फाची शुद्धता तपासणे गरजेचे, प्रशासनाने लक्ष देण्याची अपेक्षा

रोशन भामरे
सोमवार, 30 एप्रिल 2018

तळवाडे दिगर (नाशिक) : सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून रसवंती तसेच विविध खाद्य पदार्थांसाठी वापरण्यात येणाऱ्या बर्फाच्या गुणवत्तेची तपासणी करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी बर्फाची चुकीची हाताळणी करण्यात येत असल्याने बर्फ दूषित होण्याचे प्रमाण वाढत आहे. बर्फ कारखान्यातून बर्फ वाटप करताना सर्रासपणे बर्फ रसवंती तसेच थंड पेयांच्या दुकानापुढे जमिनीवर टाकला जातो व हजारो नागरिक वाहने जातात त्या ठिकाणी अक्षरशः पडलेला असतो तरीदेखील नागरी जीवला थंडावा मिळण्यासाठी थंड पेय पिताना दिसत आहेत.

सध्या उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे उकाड्यातदेखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. यापासून दिलासा मिळावा म्हणून नागरिकांकडून उसाचा रस,आईस्क्रीम,बर्फाचे गोळे,जूस सेंटर तसेच बर्फापासून तयार करणाऱ्या विविध खाद्य पदार्थांना मागणी वाढली आहे. त्यामुळे साहजिकच बर्फालाही मागणी वाढली आहे.

परंतु व्यावसायिकांकडून बर्फ खरेदी करून आणल्यानंतर योग्य पद्धतीने हाताळणी होत नसल्याचे दिसून येत आहे. बर्फाची वाहतूक करीत असताना कुठे सायकलने तर कुठे घाणेरड्या वाहनाचा वापर करणायत येत आहे. त्यासोबत बर्फ कुठल्या पाण्याने तयार होतो, ते पाणी शुद्ध आहे की नाही याचीही अन्न व औषध प्रशासनाने तपास करणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी व्यावसायिकांकडून बर्फ उघड्यावरच ठेवण्यात येत असतो. त्यामुळे रस्त्यावरील धूळ तसेच विषाणूंचा त्यावर प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.व ते पेय पिल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन आजारांना आमंत्रण मिळत आहे.

सध्या रसवंती, लिंबू सरबत, जूस सेंटर, आईस्क्रीम, बर्फाचे गोळे, फळांच्या फोडी, कुल्फी, पेप्सी आदीची दुकाने रस्त्यांच्या कडेला थाटली असून सूर्य आग ओकत असल्यामुळे ती हाउस फुल असल्याचे चित्र दिसत असून या सर्वांमध्ये बर्फाचा वापर वाढत आहे. त्यामुळे परंतु हा बर्फ अशुद्ध असेल तर याचा आरोग्यावरही विपरीत परिमाण होण्ण्याचा धोका असतो. दुषित पाण्याने तयार करण्यात आलेल्या बर्फामुळे पोटाचे आजार होण्याचा धोका असल्याचे मत तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

गेल्या वर्षी  याच दिवसात तालुक्यातील चिराई,महडव बहिरानेत या गावात कुल्फी खाल्याने ६४ लहान मुलांसह अबालवृद्धांना विषबाधा झाली होती. त्याची पुनरावृत्ती होवू नये यासाठी अन्न व औषध प्रशासनविभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: check the quality of ice administration should concentrate on that