रसायनी- पावसाचे पाणी घुसल्याने कारखानदारांचे नुकसान 

लक्ष्मण डुबे 
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

रसायनी (रायगड) पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात मोठ्या पावसात पाण्याचा निचरा सुरळीत होत नाही. नाल्याला पुर आल्यावर पुराचे पाणी बाजुच्या कारखान्यांत घुसून दरवर्षी कारखानदारांचे नुकसान होत आहे. वर्षातुन एक दोन वेळा पाणी घुसण्याचे प्रकार होतात. एमआयडीसी प्रशासन उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप औद्योगिक क्षेत्रातील कारखानदार करत आहे. 

पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील, कारखान्यांतील, तसेच कैरे गाव आणि लगतच्या डोंगरावरील पावसाचे पाणी वाहुन जाण्यासाठी क्षेत्रातील मुख्य रस्त्याच्याकडेला एमआयडीसीने नाला बांधला आहे. पुर्व पश्चिम असलेल्या या नाल्याची लांबी सुमारे आठशे मीटर इतकी आहे. नाल्यातील पाणी नदीला वाहुन जाण्यासाठी एकच मार्ग आहे. तो पण शेवटच्या टोकाला आहे. जोरदार पाऊस पडला तर पाण्याचा निचरा लवकर होत नाही. त्यामुळे मुख्य नाला व जोड नाल्याचे पाणी तुंबून बाजुच्या बकुल अँरोमँटीक प्रा. लि,अल्कली आमाईन्स लि, इनाँक्स इअर लि, आदि कारखान्यांत तसेच पाताळगंगा बीएसएनएल आणि इतर ठिकानी पाणी घसुन नुकसान होत असल्याने  कारखानदार नाराजी व्यक्त करत आहे. मोठया पावसात एक ते दोन वेळा पाणी येत असल्याचे सांगण्यात आले. पाण्याचा सुरळीत निचरा झाला पाहीजे त्याकरिता एमआयडीसीने कायम स्वरूपी उपाय योजना करावी आशी मागणी औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांनी केली आहे. 

पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होत नाही त्यामुळे नाल्याचे पाणी कारखान्यांत घुसून कारखानदारांचे नुकसान होत आहे. हे कुठ तरी थांबायला पाहीजे. पाण्याचा निचरा सुरळीत झाला पाहिजे. त्यासाठी मुख्य नाल्यावर आजुुन एक मार्ग नदीला पाणी जाण्यासाठी झाला पाहिजे आहे. 
चंद्रशेखर शेंडे, महासचिव, नँशनल इन्स्टीटयुट आँफ पर्सेनल मँनेजमेंट

Web Title: Chemical- The loss of the factory due to incessant rainwater