पक्षी वाचवा अभियानाला चेतन उतेकर यांची मदत

सुनील पाटकर
मंगळवार, 15 मे 2018

महाड (रायगड) : पक्षी वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महाड येथील फ्रिडम ग्रुपला चैतन्य सेवा संस्थेचे संस्थापक चेतन उतेकर यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. उतेकर यांनी पक्षांसाठी शंभर लाकडी घरटी आणि धान्य दिले आहे.

महाड परिसरातील तापमान 40 अंशाच्या पुढे गेल्याने जंगलातील पाणीसाठा कमी होत आहे. माणसांनाही नको करणा-या या तिव्र उन्हात लहान लहान पक्षांची अवस्था भयावह होत आहे. याकडे फ्रिडम ग्रुप मधील तरुणांनी गांभीर्याने लक्ष दिले आहे. एप्रिल महिन्यापासून पक्षी वाचवा अभियान सुरु करण्यात आले होते. या अभियानांतर्गत लाकडी घरट्यांचा वाटप करण्यात आले. या अभियानात लहान मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसत आहे. अनेकांनी झाडे, जंगल, गच्ची, बागा यामध्ये हि घरटी लावली आहेत. 

फ्रिडम ग्रुपने पक्षी वाचवा अभियानाच्या माध्यमातून आवाहन करताच महाडकर नागरिक देखील पुढे सरसावले आहेत. चेतन उतेकर यांनी या अभियानात पक्षी वाचवा अभियानास लागेल ते सहकार्य करू तसेच फ्रिडम ग्रुपचा हा उपक्रम कौतुकास्पद असून पक्षांना जीवदान देणारा असल्याचे सांगितले. 
 
Web Title: chetan uttekar contributed for save the birds mission